आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची अटक अखेर टळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून बुधवारी माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना दिलासा मिळाला. लाल मशीद हत्याकांड प्रकरणात त्यांच्यावरील अटक वॉरंट टळले आहे.

मुशर्रफ यांना खटल्याच्या सुनावणीस हजर राहण्यासाठी न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यास मुशर्रफ यांनी आव्हान दिले होते. पुढील सुनावणीस मुशर्रफ हजर राहतील, असे आश्वासन त्यांच्या वकिलांकडून देण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेच्या कारवाईला स्थगिती दिली. २७ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल. दरम्यान, एका अन्य खटल्यात क्वेट्टा येथील दहशतवादविरोधी कोर्टात मुशर्रफ यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला. बलुचिस्तानचे आरोग्य महासंचालक डॉ. फारूक आझम यांनी न्यायाधीश आफताब लोन यांच्याकडे तो सादर केला.
बातम्या आणखी आहेत...