आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६/११ हल्ल्याचा कट रचल्याची पाकची कबुली; ‘डॉन’मध्ये लिहिलेल्या लेखात माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट व प्रत्यक्ष हल्ला पाकिस्तानच्याच भूभागावरून करण्यात आल्याचे तेथील एका उच्चाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानात २६/११ हल्ल्याची चौकशी करणाऱ्या तारिक खोसी या माजी मुख्य तपास अधिकाऱ्याने या प्रकरणात सरकारने आपल्या चुका स्वीकाराव्यात असे म्हटले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, २६/११ हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला. त्याचे मिशन पाकिस्तानातूनच सुरू करण्यात आले. त्यासाठी लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांना सिंध प्रांतात प्रशिक्षण देण्यात आले.
२००८ मध्ये मुंबईतील अतिरेकी हल्ल्याच्या काही आठवड्यांनंतर पोलिस उच्चाधिकारी तारिक खोसा यांना फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) महासंचालक बनवण्यात आले. त्यांनी आता पाकिस्तानातील ‘डॉन’ वृत्तपत्रात हल्ल्याचा कट व तपासाची माहिती उजागर करणारा सविस्तर लेख लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानला मुंबई हल्ल्याच्या मुद्द्याची सोडवणूक करावीच लागेल. हल्ल्याचा कट त्याच्या जमिनीवरून रचण्यात आला व त्याची मोहीम येथूनच सुरू करण्यात आली होती. यामुळे सत्याला सामोरे जाणे आणि चुका मान्य करणे गरजेचे आहे.
लेखातील सात प्रमुख मुद्दे
1 अतिरेकी अजमल कसाब पाकिस्तानी नागरिक होता. तपास अधिकाऱ्यांनी त्याचे घर, गल्ली, शाळा आणि तो लष्कर-ए-तोयबात सहभागी झाल्याची माहिती घेतली होती.
2 तोयबाने अतिरेक्यांना सिंध प्रांतातील थट्टा भागात प्रशिक्षण दिले. तेथूनच सागरी मार्गाने मिशन सुरू झाले. तपास संस्थेने त्याचा ट्रेनिंग कॅम्प शोधून तो ताब्यात घेतला. स्फोट घडवण्याच्या उपकरणावरील आवरण कॅम्पमधून जप्त केले होते. ते मुंबई हल्ल्यात जप्त आवरणाशी हुबेहुब जुळते.
3.ज्या नावेतून अतिरेकी मुंबईकडे रवाना झाले होते तिला मुंबईत पोहोचण्याआधीच सोडून एका भारतीयाची नाव ताब्यात घेण्यात आली होती. अतिरेक्यांनी आपली नाव कराची बंदराकडे परत पाठवली होती. नंतर तिची रंगरंगोटी करून तिला लपवण्यात आले. ही नावही तपास अधिकाऱ्यांनी जप्त केली.
4.मुंबई बंदराजवळ अतिरेक्यांनी सोडलेल्या नावेचे इंजिन जपानहून लाहोरसाठी आयात करण्यात आले. नंतर नाव कराची स्पोर्ट््स शॉपमध्ये आणली. तोयबाच्या अतिरेक्यांनी इंजिनासह नाव खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले हाेते. नाव, इंजिनाचा सौदा करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.
5.मुंबईतील अतिरेक्यांना निर्देश देणारी कंट्रोल रूमही तपास अधिकाऱ्यांनी शोधून काढली. तसेच व्हीओआयपीदेखील ट्रेस करण्यात आला.
6.कमांडर व त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या अतिरेक्यांची ओळख पटवण्यात आली होती. त्या सर्वांना अटक केली होती.

या हल्ल्यासाठी वित्तपुरवठा व सामान जमवणाऱ्या लाेकांना परदेशातून अटक केली होती. त्यांच्यावर कोर्टात खटला चालवण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...