आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुत्तो हत्या: पुराव्यांचा अभावी परवेझ मुशर्रफ यांची निर्दोष मुक्त होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांची बेनझीर भुत्तो हत्याकांडातून निर्दोष मुक्त होण्याची शक्यता आहे. पुराव्याअभावी आणि मुख्य साक्षीदारांनी घूमजाव केल्याने मुशर्रफ यांच्या निर्दोषत्वावर कायदेशीर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वर्ष २००७ मध्ये बेनझीर यांची रावळपिंडी येथील निवडणूक प्रचारसभेदरम्यान हत्या झाली. त्या वेळी मुशर्रफ राष्ट्राध्यक्षपदी होते. भुत्तो यांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. जनतेच्या दबावामुळे २००८ मध्ये त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले.
तत्कालीन गृह सचिव सईद कमाल शहा, माजी आपत्ती व्यवस्थापन संचालक ब्रिगेडियर जावेद इक्बाल चिमा, गुप्तचर विभाग संचालक ब्रिगेडियर इजाझ शहा या प्रमुख साक्षीदारांनी मुशर्रफ यांच्याविरुद्ध कोणतीच साक्ष दिली नाही. अमेरिकन लॉबिस्ट मार्क सेगल यांची साक्ष अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने न्यायालयात दिली. त्यात इजाझ शहा या हल्ल्यास जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मुशर्रफ यांनीच बेनझीर हत्येचा कट रचल्याचा आरोप मार्क सेगल यांनी केला आहे.

यासाठी २६ ऑक्टोबर २००७ रोजी बेनझीर यांनी मुशर्रफ यांना पाठवलेल्या ई-मेलचा संदर्भ मार्क यांनी दिला आहे. मात्र, न्यायालयाने पुरेसे पुरावे नसल्याची टिप्पणी केली.
बातम्या आणखी आहेत...