इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यामुळे ते
आपल्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या सुनावणीला हजर राहू शकणार नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी मंगळवारी काेर्टात सांगितले.
झरदारी यांचे वकील फारूक नेइक यांनी सांगितले की, त्यांना विषबाधेमुळे त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे ते हजर राहू शकणार नाहीत. यावर न्यायमूर्ती खालिद मेहमूद रांझा यांनी त्यांची विनंती मान्य केली. १३ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. २००१ च्या भ्रष्टाचाराच्या खटल्याची सुनावणी रावळपिंडी कोर्टात करण्यात येत आहे. २००८ ते २०१३ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर असताना अधिकारांचा गैरवापर करून झरदारी यांनी अवैध संपत्ती गोळा केली, असा त्यांच्यावर आरोप आहे.