आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणमध्ये पाक सरकारचे हेलिकॉप्टर झाले क्रॅश; तालिबान्यांंकडून 7 क्रू मेंबर्सचे अपहरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/नवी दिल्ली- पाकिस्तान सरकारचे हेलिकॉप्टर Mi-17 अफगाणिस्तानात क्रॅॅश झाले. तालिबान्यांनी हे हेलिकॉप्टर पाडले असून 7 क्रू मेंबर्सचे अपहरण केल्याचे वृत्त आहे. तालिबान्यांनी नंतर हेलिकॉप्टरला आग लावली आहे.

दुर्घटनाग्रस्त चॉपर पाक सरकारच्या एका रिटायर्ड अधिकार्‍याचे असल्याची माहिती मिळाली आहे.

उज्बेकिस्तान जात होते हेलिकॉप्टर...
- हेलिकॉप्टर पाक व्याप्त पंजाब सरकारचे असून ते अफगाणिस्तानातील लोगार प्रांतात कोसळलेे.
- घटनेनंंतर तालिबानी तिथेे पोहोचले व त्यांनी हेलिकॉप्टरमधील 7 क्रू मेंबर्सचे अपहरण केले आहे. नंंतर त्यांंनी हेलिकॉप्टर पेटवून दिले.
- 'डॉन न्यूज'नुसार, हेलिकॉप्टरमध्ये 7 लोक होतेे.
- हेलिकॉप्टर मेंटेनेंससाठी ते उजबेकिस्तानात जात होते.
- अफगाणिस्तान मीडियानुसार, दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर पाकिस्तान मिलिट्रीचे आहे.

लोगारचे गव्हर्नर काय म्हणाले?
- लोगारचे गव्हर्नरने सांगितले की, अजरा जिल्ह्यातील माटी भागात हे हेलिकॉप्टर कोसळले.
- इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशननुसार, 'पाक जनरल राहिल शरीफ यांनी क्रू मेंबर्सच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहे. या कामात अफगाणिस्तान सरकारकडे मदत मागितली आहे.
- 'सपोर्ट मिशन'चे जनरल निकल्सन यांनी पाकिस्तानला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली असल्याचे अफगान मिलिट्रीचे प्रवक्तेे ले. जनरल असीम बाजवा यांनी सांगितले.
- 'अफगाण सरकार व अफगाण आर्मीने सर्व क्रू मेंबर्सच्या सुटकेेसाठी प्रयत्न सुरु केले आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...