आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आशियात वर्चस्वासाठी भारताचे नेहमीच प्रयत्न : अजीज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारताने दक्षिण आशियात वर्चस्व कायम ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. मात्र, आपल्या फायद्याचे ‘परिणामकारक’ संरक्षण करून पाकिस्तानने भारताचे हे प्रयत्न फेटाळले आहेत, असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी केला आहे.

समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत भारत-पाकिस्तानविषयक संबंधांबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अजीज म्हणाले की, दक्षिणा आशियात आपलेच वर्चस्व असावे असा भारताचा प्रयत्न राहिला आहे, पण पाकिस्तानने आपल्या फायद्याचे तसेच काश्मीर, आण्विक शक्ती संतुलन आणि पारंपरिक समतोल यांचे नेहमीच परिणामकारकपणे संरक्षण केले आहे. पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि महत्त्वाचे हेतू यांचे संरक्षण करणे ही एक देश म्हणून मोठी उपलब्धी आहे, असा दावा त्यांनी केला. अफगाणिस्तानी निर्वासितांच्या समस्येबाबत बोलताना अजीज म्हणाले की, निर्वासित छावण्या दहशतवाद्यांसाठी सुरक्षित स्थळे झाली आहेत. त्यामुळे हा सुरक्षाविषयक मुद्दा झाला आहे.

चुकीच्या धोरणाची मोठी किंमत चुकवली
रशियाने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी स्वीकारलेल्या धोरणांची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागत आहे. त्यामुळे ५० लाख अफगाण निर्वासित पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. त्यातून अस्थिरता निर्माण झाली आहे. कुठेही हस्तक्षेप करायचा नाही म्हणजेच पाकिस्तान दुसऱ्याचे युद्ध लढणार नाही, असे धोरण निश्चित करण्यात आले आहे, असा दावाही अजीज यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...