आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan: Is Bakhtawar Bhutto Set To Replace 'sulking' Bilawal In PPP?

बिलावलला टाळून झरदारी करणार बख्तावरला वारसदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी आता मुलगी बख्तावरला राजकीय रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. झरदारी पुत्र बिलावल पूर्वीपासूनच राजकारणात सक्रिय आहेत.
बिलावल पाकिस्तान पीपल्स पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत; परंतु गेल्या काही दिवसांपासून झरदारी आणि बिलावल यांच्यात वितुष्ट आल्याचा बातम्या आहेत. त्या अटकळींना आता पुन्हा ऊत आला आहे. बिलावल लंडनमध्ये राहतात. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली आहे. पुढील शिक्षणासाठी त्यांना राजकारणातून दोन वर्षांची विश्रांती हवी आहे. त्यामुळेच बिलावल यांच्या गैरहजेरीत बख्तावरला राजकारणात सक्रिय करण्याचा झरदारींचा इरादा हाेता. एवढेच नव्हे, तर बख्तावरचे प्रशिक्षणदेखील सुरू झाले आहे. म्हणूनच ती ४ एप्रिल रोजी आजोबा झुल्फिकार अली भुत्तो यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषणदेखील देऊ शकते. झुल्फिकार भुत्तो यांनी पीपल्स पार्टीची स्थापना केली होती. त्यांची मुलगी बेनझीर भुत्तो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान राहिल्या होत्या.