आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचा कमांडर ठार, सलग दोन दिवस ड्रोन हल्ले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी संघटनेने यासंदर्भात दुजोरा दिला. - Divya Marathi
दहशतवादी संघटनेने यासंदर्भात दुजोरा दिला.
पेशावर - पाकिस्तानात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात जमात उल अहरारचा कमांडर उमर खालिद ठार झाला आहे. दहशतवादी संघटनेने यासंदर्भात दुजोरा दिला. सलग दोन दिवस अमेरिकेने पाकिस्तानच्या आदिवासी भागांत ड्रोन हल्ले केले. यात जवळपास 50 लोक ठार झाल्याची नोंद आहे. ठार झालेल्यांमध्ये प्रामुख्याने जमात उल अहरारच्या सदस्यांचा समावेश आहे. जमात उल अहरार तालिबानपासून वेगळी झालेली पाकिस्तानी दहशतवादी संघटना आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन याच आठवड्यात पाकिस्तान दौऱ्यावर जात आहेत. त्या निमित्ताने अमेरिकेचे पाकिस्तानवरील ड्रोन हल्ले चर्चेत आहेत.
 
 
असद आफ्रिदी नवा म्होरक्या
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात उमर खालिद खोरासनी ठार झाल्याच्या वृत्तास जमात उल अहरारच्या एक प्रवक्त्याने माध्यमांशी संवाद साधताना दिली. आता त्याची जागा असद आफ्रिदी घेणार आहे. उमर खालिद खोरासनीचा सर्वात जवळचा सहकारी म्हणून आफ्रिदीला ओळखले जात होते. खोरासनी जिवंत असताना त्यानेच असदला नंबर दोनचे स्थान दिले होते. तोच आता या संघटनेचा नवीन म्होरक्या होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...