आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोटेक्टिव्ह कस्टडीत मसूद अझहर , पाक कायदे मंत्र्यांचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला अटक करण्याऐवजी प्रोटेक्टिव्ह कस्टडीत घेण्यात आले आहे. याचा खुलासा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे कायदेमंत्री राणा सनाउल्ला यांनी केला आहे. मसूद सोबत त्याच्या काही साथीदारांनाही कस्टडीत घेण्यात आले.

पठाणकोट हल्ल्यात सहभाग असल्याचे कळाल्यानतंरच अटक - पाक मंत्री
- राणा सनाउल्ला म्हणाले, 'आम्ही मसूद आणि त्याच्या साथीदारांना प्रोटेक्टिव्ह कस्टडीत ठेवले आहे. जर पठाणकोट हल्ल्यात त्याचा हात असेल तर त्याला अटक केली जाईल.'
- ते म्हणाले, आम्ही बंदी घातलेली संघटना 'जैश' विरोधात पाकिस्तानच्या राष्ट्रीय कार्यक्रमानुसार कारवाई केली आहे.
- ही कारवाई पंजाब पोलिसांच्या काउंटर टेररिझम डिपार्टमेंटने केली आहे.

जैशने अटकेचा दावा फेटाळला
- दुसरीकडे, जैश-ए-मोहम्मदने मसूदच्या अटकेचा दावा फेटाळला आहे.
- फेसबुक पोस्टवर म्हटले आहे, 'संपूर्ण जगात आमच्या अटकेचा आनंद साजरा केला जात आहे. मात्र तसे काहीही झालेले नाही. आणि जरी तसे झाले तर त्याने काय होणार आहे, उलट त्यामुळे आम्हाला आणखी जिहाद करण्याची ताकद मिळेल.'
पुढील स्लाइडमध्ये, आधी अटक केल्याचा दावा, नंतर पाकचा यू-टर्न
बातम्या आणखी आहेत...