आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये मशिदीत बॉम्बस्फोट; २५ जण ठार, नमाजाच्या वेळी आत्मघाती हल्‍ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानच्या वायव्य आदिवासी प्रांतात शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका आत्मघाती हल्लेखोराने घडवलेल्या बॉम्बस्फोटात २५ जण ठार तर २९ जण जखमी झाले. अफगाणिस्तानला लागून असलेल्या अनबर प्रांतातील एका मशिदीत शुक्रवारची नमाज सुरू होती. नमाजसाठी मोठी गर्दी झाली होती. दुपारी २ वाजेच्या सुमाराला आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवून घेतले. या बॉम्बस्फोटात २५ जण ठार तर २९ जण जखमी झाले. हा आत्मघाती बॉम्बस्फोट होता, अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने दिली. बचाव पथके तसेच पोलिसांची पथके घटनास्थळी रवाना झाली अाहेत. जखमींना वैद्यकीय उपचारासाठी स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
काही जखमींना बाजौर एजन्सी, चारसद्दा आणि पेशावर येथील रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.
कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती, पण पाकिस्तानी तालिबान संघटना नेहमीच न्यायालये, शाळा आणि मशिदींना लक्ष्य करत असल्याने या संघटनेचाच हात असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारीच लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्यासोबत बैठक घेऊन दहशतवादाविरोधात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शेवटच्या दहशतवाद्याचा नि:पात होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर काही तासांतच हा आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तानी लष्कराने जून २०१४ पासून वायव्य आदिवासी भागातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ‘झर्ब-ए-अझ्ब’ ही मोहीम सुरू केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...