आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणु चाचणी थांबवण्यासाठी अमेरिकेने दिली होती 5 अब्ज डॉलर्सची ऑफर, नाकारली - नवाज शरीफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या हिताची चिंता नसती तर ती ऑफर स्वीकारली असती असा दावा शरीफांनी केला आहे. (फाईल) - Divya Marathi
पाकिस्तानच्या हिताची चिंता नसती तर ती ऑफर स्वीकारली असती असा दावा शरीफांनी केला आहे. (फाईल)
इस्लामाबाद - पनामागेट भ्रष्टाचार प्रकरणी अडकलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आपण किती शरीफ (प्रामाणिक) आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी पाकिस्तानने 1998 मध्ये घेतलेल्या अणु चाचणीचा संदर्भ दिला. त्यावेळी आपण पंतप्रधान असताना ही चाचणी रोखण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी 5 अब्ज अमेरिकन डॉलरची ऑफर दिली होती. पाकिस्तानच्या हिताची चिंता नसती तर ती ऑफर स्वीकारली असती असा दावा शरीफांनी केला आहे. 
 

पनामागेट विरोधकांचा षडयंत्र
- पाकिस्तानचे स्थानिक माध्यम जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकच्या पंजाब प्रांतात आयोजित चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात शरीफ बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या नेत्यांवर निशाना साधला आहे. 
- शरीफ म्हणाले, विरोधकांचा टार्गेट केवळ मीच आहे. ते मला हटवण्याचा षडयंत्र रचत आहेत. लोकशाही मार्गाने सत्ता मिळवण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे, आता इतर मार्गांचा अवलंब करत आहेत. 
- शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. त्यांच्या विरोधात तपास करणाऱ्या जेआयटीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयास सुपूर्द केला. यात त्यांच्या आणि कुटुंबियांच्या नावे परदेशात अब्जावधींची संपत्ती असल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर 1992-93 मध्ये शरीफांच्या कन्येची संपत्ती 21 पटीने वाढली असा दावा सुद्धा अहवालात करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...