आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाज शरीफांसह मुलगी, जावयावर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित; तुरुंगवास होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व त्यांच्या कुटुंबाविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. शरीफ यांच्यासह त्यांची मुलगी मरियम नवाझ, जावई कॅप्टन मोहंमद सफदर यांच्यावर लंडनमधील संपत्तीप्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले आहेत.  त्यासोबतच १६ परदेशी कंपन्यांशी संबंधित इतर चार प्रकरणांतही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.   परदेशात संशयित कंपन्यांच्या नावावर मालमत्ता कमावल्याचे पनामा पेपर लीक प्रकरण समोर आल्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्याविरोधात नॅशनल अकाउंटीबिलिटी न्यायालयाने हे आरोप निश्चित केले. कोर्टाने ६७ वर्षीय माजी पंतप्रधान, त्यांची मुलगी, जावई यांच्याविरोधातील याचिका रद्द करण्यासंबंधीची विनंती फेटाळून लावली आहे. सुनावणीच्या वेळी मरियम व सफदर उपस्थित होते. नवाझ शरीफ पत्नीवर उपचार करण्यात व्यग्र असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, असे कोर्टाला कळवण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...