आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने पुन्हा सुरू केले मैत्रीचे चमन गेट, अफगान सीमेजवळील प्रवेशद्वार उघडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तान-अफगाणिस्तानयांच्यातील मैत्रीचे द्वार म्हणून आेळखले जाणारे चमन गेट गुरुवारी पुन्हा खुले करण्यात आले आहे. हे प्रवेशद्वार १८ ऑगस्टपासून बंद करण्यात आले होते.
बाब-ए-दोस्ती (मैत्री द्वार) म्हणून या सीमेवरील प्रवेशद्वाराचे महत्त्व आहे. परंतु १८ ऑगस्ट रोजी काही अफगाणी नागरिकांनी पाकिस्तानच्या ध्वजाचे चमन गेट जवळ दहन केले हाेते. त्याचबरोबर पाकिस्तानच्या विरोधातील घोषणाबाजीही करण्यात आली होती. त्यामुळे भडकलेल्या पाकिस्तानने हे प्रवेशद्वार बंद केले होते. गुरुवारी हे प्रवेशद्वार सुरू करण्याच्या निमित्ताने गेटजवळ दोन्ही बाजूंचे लोक जमा झाले होते. त्यांनी पाकिस्तान सरकारच्या निर्णयाचे स्वागत उत्साहाने स्वागत केले. तत्पूर्वी उभय सरकारमध्ये त्यावर चर्चेच्या अनेक फेऱ्याही पूर्ण झाल्या होत्या. बुधवारी उच्चस्तरीय चर्चा झाल्या. त्यात चमन गेट उघडण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली. लष्कराच्या १५ व्या फ्लॅग मीटिंगमध्ये याबाबतचा निर्णय झाला आहे. पाकिस्तानकडून लेफ्टनंट मुहंमद चेंगेझ त्यांचे समकक्ष कर्नल मुहंमद अली चर्चे सहभागी झाले होते.

व्यापारावर परिणाम
चमन परिसर हा पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. १८ आॅगस्टपासून गेट बंद असल्यामुळे त्याचा दोन्ही देशांतील व्यापारावर वाईट परिणाम दिसून आला होता. तोरखम भागातील बाजारपेठेच्या दृष्टीनेही हा नाका महत्त्वाचा आहे.
लेखी माफीनामा घेतला
पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी या मुद्द्यावर उच्चस्तरीय चर्चा झाली होती. त्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, अशी हमी अफगाणिस्तानकडून घेण्यात आली आहे. त्याबाबतचा लेखी माफीनामाही अफगाणने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...