आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात होळी, दिवाळीचीही सुटी, पाकिस्तानी संसदेने दिली मंजुरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या हिंदू समुदायासाठी प्रथमच होळी व दिवाळीची सुटी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय ईस्टर सार्वजनिक सुटी असेल. पाकिस्तानी संसदेने मंगळवारी या सुट्यांना मंजुरी दिली.

पीएमएल-एनचे हिंदू खासदार रमेश कुमार वांकवानी यांनी संसदेत प्रस्तावात म्हटले होते की, सरकारने होळी, दिवाळी आणि ईस्टरसाठी अधिकृत सुटी जाहीर करावी. त्यावर मंत्री पीर अमीनुल हसनत शाह यांनी या सुटीबाबत गृह मंत्रालयाने सरकारी कार्यालयांना यापूर्वीच आदेश दिले असल्याचे सांगितले.