आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरख्यातील अतिरेक्यांचा बेछूट गोळीबार; विद्यार्थ्यांसह 12 ठार; पाकिस्तानमध्‍ये हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर- बुरखाधारी दहशतवाद्यांनी कृषी प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात शुक्रवारी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात एक सुरक्षा रक्षक, ६ विद्यार्थ्यांसह १२ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानातील वायव्येकडील पेशावर शहरात ही रक्तपाताची घटना घडली. त्यानंतर सुरक्षा दलासोबत दहशतवाद्यांची दोन तास धुमश्चक्री सुरू होती. त्यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ३२ जण जखमी झाले. 


तीन बुरखाधारी दहशतवादी शुक्रवारी सकाळी ऑटो रिक्षाने कृषी प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात दाखल झाले होते. ईदची सुटी असल्यामुळे संस्था बंद होती. परंतु ७०  विद्यार्थी वसतिगृहात होते. दहशतवाद्यांनी संस्थेच्या आवारात प्रवेश करताच इमारतीत अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्यात नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. घटनेत किमान ३२ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले आणि पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. लष्करी कारवाई सुरू असताना इमारतीमध्ये स्फोटांचेही आवाज येत होते. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून आत्मघाती जॅकेट, पिस्तूल, स्फोटके जप्त केली आहेत. प्रत्यक्षदर्शींनी मात्र मृतांची संख्या ११ वर गेल्याचा दावा केला आहे. त्याची पुष्टी मिळू शकली नाही. जखमींमध्ये तीन पोलिस पत्रकाराचाही समावेश आहे.

 

तेहरिक-ए-तालिबानने स्वीकारली जबाबदारी

पेशावरमधील हल्ल्याची जबाबदारी तेहरिक-ए-तालिबानने स्वीकारली आहे. तालिबान ही दहशतवादी संघटना अजूनही पाकिस्तानात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेशावर अफगाणिस्तान सीमेपासून जवळ आहे. गेल्या काही वर्षांत तालिबानी दहशतवादी कारवायांत वाढ झाली आहे.

 

अनर्थ टळला..
ईदच्या निमित्ताने वसतिगृहाला मोठी सुटी होती. त्यामुळे इमारतीतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. अन्यथा मृतांची संख्या मोठी असती. त्यामुळे अनर्थ टळला, असे खैबर पख्तुनख्वाचे पोलिस महासंचालक सलाहुद्दीन खान मेहसूद यांनी सांगितले.


२०१४ मध्ये लष्करी विद्यालय लक्ष्य
तालिबानी दहशतवाद्यांनी २०१४ मध्ये लष्करी विद्यालयाला लक्ष्य केले होते. त्यात किमान १४१ जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानच्या इतिहासातील ही मोठ्या रक्तपाताची घटना होती.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS... 

बातम्या आणखी आहेत...