आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेसमोर पाक मांडणार ‘रॉ’बद्दलचे गा-हाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - एकीकडे मैत्री करतानाच दुस-या बाजूला भारताच्या विरोधात कांगावा करण्याची कोणतीही संधी पाकिस्तान सोडत नाही. म्हणूनच अमेरिकेसोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत ‘रॉ’ या भारताच्या गुप्तचर यंत्रणेविरोधात गरळ आेकण्याचे काम केले जाऊ शकते. परराष्ट्र सचिव एझाझ चौधरी अमेरिकेशी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.

‘रॉ’ या भारताच्या परदेशातील गुप्तचर संस्थेच्या विरोधात अगोदर पाकिस्तानी नेत्यांना सातत्याने आरोप केले. ही संस्था दहशतवादाला चालना देत आहे. अशा आशयाचे आरोप नेत्यांनी सातत्याने केले. त्यानंतर अमेरिकेसोबतच्या आगामी उच्चस्तरीय बैठकीत ‘रॉ’ला बदनाम करणारा मुद्दा उपस्थित करण्याची रणनीती पाकिस्तानने निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. चौधरी मंगळवारी अमेरिकेला रवाना होतील. आठवड्याच्या शेवटी ही बैठक होईल. त्या बैठकीत चौधरी हा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची शक्यता आहे. वास्तविक भारताने पाकिस्तानचा हा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे, असे ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानचे दावे बिनबुडाचे असतात.

संरक्षणमंत्री पर्रिकरांच्या वक्तव्याचा विपर्यास
भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन पाकिस्तान अमेरिकेसोबतच्या बैठकीत आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. दहशतवादाला दहशतवादानेच उत्तर दिले पाहिजे, असे पर्रिकर यांनी म्हटले होते. त्याला पाकिस्तानने आक्षेप घेत पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांना भारताचा कसा पाठिंबा आहे, असा कांगावा सुरू केला. देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.