आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकमधील हिंदू राजपूत फॅमिलीची लग्झरी LIFE, असा आहे थाट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरकोट संस्थानाचे युवराज करणीसिंह - Divya Marathi
अमरकोट संस्थानाचे युवराज करणीसिंह
इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानच्या अमरकोट संस्थानचे राणा हमीरसिंह यांचे मोठे प्रस्थ आहे. पाकिस्तानातील माझ्यासह सर्व हिंदूंचे संरक्षण पाकचे मुस्लिमच करतात असे ते सांगतात. त्यांच्या बॉडीगार्डकडे AK-47 रायफल्स आहेत.
 

भारत-पाकिस्तानबाबत काय म्हणतात...
- हमीरसिंह हे भारताचे पंतप्रधान मोदींबाबत आशावादी आहेत. मोदींनी पाकिस्तानशी संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्न केल्याचे ते सांगतात.
- दोन्ही देश आपसात लढत राहिले तर तिस-याचा (चीन, अमेरिका) फायदा होईल असे सूचवतात.
- भारत-पाक या दोघांनी मित्र म्हणून एकत्र बसून समस्येवर उत्तर शोधले पाहिजे.
- पाकिस्तानमध्ये 97 टक्के मुस्लिम आणि फक्त तीन टक्के इतर धर्मिय आहेत. या सर्वांची सुरक्षा पाकिस्तानातील मुस्लिम करतात.
- पाकिस्तानातील मुस्लिम स्वतःला जेमरचा राजा पोरसचे वंशज मानतात.
- हमीरसिंहाचे कुलदैवत हिंगलाज मंदिराची सुरक्षाही मुस्लिमांकडेच असल्याचे ते सांगतात. 
- भारतातही मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदतात, राहतात याकडे ते लक्ष वेधतात.
- दोन्ही देशांतील सामान्य लोकांप्रमाणेच त्यांचीही इच्छा आहे की भारत-पाक यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध असावेत.
 

कोण आहेत हमीरसिंह?
- हमीरसिंह यांच्या कुटुंबाचे पाकिस्तानातील राजकारणात वजन आहे.
- त्यांचे वडील राणा चंद्रसिंह अमरकोटचे राजे होते.
- चंद्रसिंह सात वेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री होते. त्यांचे पाकचे माजी पंतप्रधान जुल्फीकार अली भुट्टोंसबत मैत्रीचे संबंध होते.
- पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) मधून वेगळे झाल्यानंतर राणा चंद्रसिंह यांनी पाकिस्तान हिंदू पार्टी स्थापन केली होती. त्यांचा झेंडा भगवा होता.
- त्यात ओम आणि त्रिशूल होते. त्यांचे 2009 मध्ये निधन झाले.
 

भारतीय सून
- 20 फेब्रुवारी 2015 रोजी हमीरसिंह यांच्या मुलाचा विवाह राजस्थानच्या पद्मिनीसोबत झाला होता.
- वऱ्हाड पाकिस्तानच्या अमरकोट संस्थानातून भारतात आले होते.
- वर होता हमीरसिंहाचा मुलगा करणीसिंह आणि वधू होती कानोता (जयपूर)चे ठाकूर मानसिंह यांची मुलगी पद्मिनी.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्यांच्या पाकिस्तानातील थाटाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...