आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लष्कर-सरकारमधील संघर्ष मांडणाऱ्या पत्रकारावर निर्बंध, PAK मध्ये लाेकशाहीला दडपण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात दहशतवाद्यांबद्दल लष्कर सरकार यांच्यातील संघर्षाला चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकाराला देश सोडून जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. देशातील सर्वात जुने इंग्लिश दैनिक डॉनचे सहायक संपादक सिरिल अल्मिडा यांनीच ट्विटरवरून हा गौप्यस्फोट केला.
सिरिल यांनी सत्ताधारी लष्कर सरकार यांच्यातील संघर्षाचे वास्तव जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु हाच प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. सिरिल यांच्यावर परदेशात जाण्यावर बंदी घालण्यात आल्याच्या वृत्ताला गृह खात्याकडून दुजोरा मिळाला नाही किंवा या दाव्याचे खंडनही करण्यात आलेले नाही. सिरिल यांनी गेल्या आठवड्यात यासंबंधीचा रिपोर्ताज प्रकाशित केला होता. त्यानुसार शरीफ यांच्या सरकारने लष्कराला काही गोष्टी बजावल्या आहेत. दहशतवाद्यांना लष्कराने आश्रय देणे बंद केले पाहिजे. त्या ऐवजी राज्य सरकार तसेच केंद्राला सहकार्य करावे, अशी सूचना त्यांनी लष्कराला केली होती. त्याबद्दलची बातमी सिरिल यांनी जाहीर करून सरकारचा खपा मर्जी आेढून घेतल्याचे समोर आले आहे.

मी हैराण, दु:खी
सरकारच्याअशावागणुकीमुळे मी हैराण आहे. दु:खी आहे. मला कोठेही जायचे नाही. हेच माझे घर आहे पाकिस्तान. आम्ही बातमीच्या बाजूने आहोत, असे संपादक जफर अब्बास यांनी म्हटले.
-सिरिल अल्मिडा, पत्रकार.

एक्झिट कंट्रोल यादीत समावेश
मला परदेशात जाता येणार नाही. कारण तुमचे नाव एक्झिट कंट्रोल यादीत आहे. त्याचे पुरावे देखील दाखवण्यात आले आहेत, असे सिरिल यांनी स्पष्ट केले.

प्रेसची दयनीय स्थिती
पाकिस्तानात प्रेसची स्थिती अतिशय दयनीय आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये पाकिस्तानला १४७ वे स्थान मिळालेले आहे. त्यात १७९ देशांचा समावेश आहे. १९९२ पासून आतापर्यंत पाकिस्तानात ५९ हून अधिक पत्रकारांची हत्या झाली आहे, असा दावा कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्सनी केला आहे. दहशतवादामुळे देशात अस्थिरता अाहे.
लाहोर कोर्टात अर्ज, ‘मूर्ती परत आणा’
इस्लामाबाद सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात आता हजार वर्षांपूर्वीची नर्तिकेची मूर्ती वापस मिळावी, या मागणीत वाढ झाली आहे. याबाबत सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका लाहौर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सोमवारी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. २५०० इसवी सनपूर्वची ही मूर्ती १०.५ सेंटीमीटर लांबीची आहे. १९२६ मध्ये सिंधू संस्कृतीचे शहर मोहनजोदडोच्या उत्खननात ती सापडली होती. फाळणीनंतर पाकिस्तानने ही लाहौर संग्रहालयाची संपत्ती असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी युनेस्कोला पत्र पाठवले जाणार असल्याचे पाकिस्तानच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे प्रमुख जमल शाह यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...