इस्लामाबाद - संरक्षण सहकार्य अंतर्गत पाकिस्तान आणि रशिया या दोन देशांनी संयुक्तरित्या लष्करी सराव करण्यास सहमती दिली आहे.शीत युध्दाच्या कालखंडात संबंधात आलेली कटूता दूर सारुन मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचे हे चांगले चिन्ह समजले जात आहे.याबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खवाजा असिफ आणि रशियाचे सर्जे शोइगू यांच्या दरम्यान मॉस्कोत करार झाला. आम्ही संरक्षण उद्योग आणि लष्करी प्रशिक्षण अशा दोन्ही क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास तयार झाला असल्याचे असिफ यांनी रशियन वृत्तसंस्था स्पुटनिक इंटरनॅशनलला सांगितले.
असिफ हे सरकारी दौ-यावर असून ते मॉस्कोतील प्रादेशिक सुरक्षा परिषदेत उपस्थित राहणार आहेत.त्यांनी रशियाच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली. चर्चेत लष्करी प्रशिक्षण आणि महत्त्वाचे शस्त्रे आणि उपकरण आयाती बाबत संमती झाली आहे.संयुक्त लष्करी सहकार्यास प्रोत्साहन दिले जाईल,असे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानी प्रसिध्दी पत्रकात म्हटले.