आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाका दहशतवादी हल्ल्यांत आयएसआयचा नाही, पाकिस्तानचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयचा ढाका हल्ल्यात हात असल्याचा आरोप माध्यमांनी केला. मात्र, याचा स्पष्ट इन्कार पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. बांगलादेशच्या राजधानीत झालेल्या या बॉम्बहल्ल्यांत २० जण ठार झाले. पैकी एक भारतीय व्यक्तीही यात बळी गेली. माध्यमांचा वृत्तांत खोटा, बिनबुडाचा आणि चिथावणीखोर असल्याचा आरोप पाकिस्तानने केला.

माध्यमांच्या वृत्तांना पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते नफीस झाकारिया यांनी एका निवेदनाद्वारे उत्तर दिले आहे. ढाक्यातील रेस्टॉरंटवर झालेल्या हल्ल्यांत आयएसआयचा हात नाही. भारतीय माध्यमांनी बेजबाबदारपणे वृत्तांत प्रकाशित केले आहेत. याला कोणताही वास्तवाचा आधार नसल्याचे नफीस म्हणाले. पाकिस्तानने सर्व आरोपांचा इन्कार केला असून भारतीय माध्यमांवर तीव्र शब्दांत टीका केली. बांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार गोहर रिझवी यांनीदेखील हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे, याकडे नफीस यांनी लक्ष वेधले. भारतीय माध्यमांचा हेतू यातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. बांगलादेशातील बांधवांविषयी आम्हाला सहानुभूती असून या हल्ल्यांचा पाक निषेध करतो. गोहर रिझवींनी दहशतवादविरोधी मोहिमेसाठी पाककडे सहकार्य प्रस्ताव पाठवला असून पाकिस्तानने तो स्वीकारला असल्याचेही नफीस झाकारिया यांनी सांगितले.
रिझवी होते पाक दूतावासाच्या संपर्कात
आयएसआयचा हात या हल्ल्यांत असल्याचे आपण सांगितले नाही, असे गोहर रिझवी यांनी पाक दूतावासाला तत्काळ कळवले होते. पाकविरोधी अधिकृत निवेदन बांगलादेशने दिलेले नसल्याचेही रिझवींनी स्पष्ट केले. आपण भारतीय माध्यमांच्या वृत्तांशी सहमत नसल्याचे रिझवी यांनी सांगितल्याचे नफीस म्हणतात.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...