आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्दाम पाकिस्तानची धमकी, सिंधूचे पाणी रोखले तर चीनला सांगून ब्रह्मपुत्रेचे पाणी थांबवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- सिंधू जल करारावर भारताच्या कठोर भूमिकेला जोरदार सडेतोड देण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. भारताने जर सिंधू नदीचे पाणी रोखले तर चीनला सांगून आम्ही ब्रह्मपूत्रा नदीचे पाणी थांबवू, अशी धमकी वजा इशारा पाकिस्तानने मोदी सरकारला दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे डीफॅक्टो मिनिस्टर सरताज अजिज यांनी काल (27 सप्टेंबर) म्हटले, की भारताने 56 वर्षे जूना सिंधू करार मोडीत काढला तर आम्ही संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊ. तसेच करार रद्द करणे एक प्रकारे युद्धाला चेतावनी देण्यासारखे आहे, हेही भारताने लक्षात ठेवावे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या परराष्ट्र धोरणाचे सल्लागार सरताज अजिज यांनी नॅशनल असेम्बलीत सांगितले, की आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे भारत हा करार एकट्याने मोडीत काढू शकत नाही. पण तरीही भारताने करार रद्द केला तर दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. करार कायम राहिला नाही तर पाकिस्तान आणि भारताच्या अर्थव्यवस्थांना याचे नुकसान सहन करावे लागेल. आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा पर्यायही आमच्याकडे खुला आहे.
पाकिस्तान गेला आंतरराष्ट्रीय न्यायालयात
- भारताने सिंधू करार रद्द करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याने घाबरलेला पाकिस्तान आज इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये गेला आहे. तसेच वर्ल्ड बॅंकेचाही दरवाजा ठोठावला आहे.
- पाकिस्तानी डेलिगेशनचे नेतृत्व अॅटर्नी जनरल अश्तर ऑसफ अली यांनी केले.
- आंतराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानने सिंधू जल करारात आर्टिकल 9 संदर्भात मध्यस्थी करावी अशी अपील केली आहे.
- आर्टिकल 9 मध्ये नीलम आणि चिनाबवरील हायड्रोपॉवर प्रोजक्टचा उल्लेख आहे.
- या कराराप्रमाणे वर्ल्ड बॅंकेने तीन न्यायाधिशांच्या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनची स्थापना केली आहे.
अमेरिकी मीडिया म्हणाला- पाकिस्तानने भारताच्या संयमाचा अंत पाहू नये
वॉल स्ट्रीट जर्नलने सांगितले, की
- नरेंद्र मोदी वारंवार चर्चेसाठी पुढाकार घेत आहेत. पण पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
- मोदींच्या चर्चेच्या प्रस्तावाला पाकिस्तान नाकारत असेल तर तो आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर एकटा पडेल. सध्याही अशीच अवस्था दिसून येत आहे.
- पाकिस्तानी लष्कर जर सीमेपार शस्त्रे आणि दहशतवादी पाठवत असतील तर मोदींना कठोर पावले उचलावे लागतील.
- दहशतवादावर भारताने आपली भूमिका कायम स्पष्ट ठेवली आहे. पण कॉंग्रेस आणि भाजप सरकार यावर तोडगा काढण्यात अयशस्वी ठरले.
- मोदींचे कौतुक करायला हवे. त्यांनी पाकिस्तानवर हल्ला न करता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पाडण्याची भाषा केली आहे.
- सिंधू जल करारावर मोदींनी कडक भूमिका घेतली आहे. तसेच पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशन्सचा दर्जा काढण्यावही विचार सुरु आहे.
- पाकिस्तानने कायम भारताचा विरोध केला आहे. दहशतवाद्यावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. दहशतवादी हल्ल्याची तीव्रता पाकिस्तानला समजलेली नाही हे यातून दिसून येते.
पुढील स्लाईडवर वाचा.... आणखी काय म्हणाले सरताज अजिज... चीनला सांगून कसे थांबवणार ब्रह्मपुणेचे पाणी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...