आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Says It Is Making Serious Efforts, But Not Solely Responsible For Afghanistan Taliban Talks

अफगाण-तालिबान शांतता चर्चेसाठी जबाबदार नाही; झाकारियांची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान्यांदरम्यान चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तान शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, या संवादाची जबाबदारी एकट्या पाकिस्तानवर नाही, अशी भूमिका पाकने व्यक्त केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफिस झाकारिया यांनी याविषयी भूमिका मांडली. विविध चार पक्षांकडे अफगाणिस्तान शांतता चर्चेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे या दिशेने प्रगती होत नसेल तर पाकिस्तान एकटा त्यासाठी जबाबदार नसल्याचे नफिस यांनी म्हटले आहे.
दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तान नेहमीच सक्रिय प्रयत्न करत राहिला आहे. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित होणे पाकच्या हिताचे आहे. त्यामुळे पाक यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी सोमवारी केलेल्या भाषणात म्हटले होते की, पाकिस्तानने वाटाघाटींसाठी तालिबानी गटांना आणावे, अशी आमची अपेक्षा नाही. अफगाण संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्रात घनी बोलत होते. दरम्यान, बीबीसी उर्दूच्या वृत्तात म्हटले आहे की, तालिबानी गट कतारमध्ये स्थायिक आहे. या गटाचे प्रतिनिधी मंडळ कराचीमध्ये गेले होते. त्यांना अफगाण सरकारशी थेट बातचीत करायची होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा दोन्ही देशांनी दिलेला नाही