आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक सरकारने केले २५४ संशयास्पद मदरसे बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानातील संशयास्पद २५४ मदरसे बंद करण्यात आले आहेत. देशभरातील अनेक मदरशांची नोंदणीदेखील नाही. सरकारच्या परवानगीशिवाय हे मदरसे चालवण्यात येत होते. त्या माध्यमातून कट्टरवादी कारवाया केल्या जात होत्या.

सिंध, खैबर पख्तुनख्वा, पंजाबमध्ये हे मदरसे आहेत. सिंधमधील १६७ संशयित मदरशांना बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानातील पंजाबमधील दोन तर सिंध प्रदेशातील ७२ मदरसे यापुढे चालवले जाणार नाहीत, असे गृहमंत्री बालीघौर रेहमान यांनी सांगितले. देशातील जातीय हिंसाचाराला रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत.

राष्ट्रीय कृती आराखडा
दहशतवाद्याचेउच्चाटन करण्यासाठी पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये एका शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १५० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले त्यांनी दहशतवाद्यांच्या विरोधात धडक लष्करी कारवाईला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.