इस्लामाबाद/नवी दिल्ली - पाकिस्तानात
दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद यांच्या विरोधात भारताने गुप्त मोहिम राबवण्याचा साधा विचारही केला, तरी त्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल. अशी धमकी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला दिली आहे. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, गरज भासल्यास पाकिस्तानात दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद यांच्या विरोधात भारत 'गुप्त मोहिम' राबवू शकतो. त्यांच्या या विधानाचा समाचार घेत पाकिस्तानने भारताला धमकी दिली आहे. पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) सरताज अजीज यांनी मंगळवारी राठोड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
सरताज काय म्हणाले ?
इस्लामाबादेत सरताज अजीज म्हणाले, दाऊद आणि हाफिज सईदला पकडण्यासाठी भारत पाकिस्तानात काही ऑपरेशन चालवणार असेल, तर त्यांना प्रत्युत्तर देण्यात येईल. अजीजने म्हटले, ''पाकिस्तानात हल्ला करण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. कोणी जर तसे केलेच तर त्याला तेवढ्यात ताकदीने उत्तर देण्यात येईल. भारताकडून कधीही हल्ल्याची धमकी आली, तरी पाकिस्तान घाबरेल किंवा दबावात येणार नाही.''
काय म्हणाले होते राठोड ?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री राठोड म्हणाले, केंद्र सरकार दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईद यांसारख्या शत्रुंविरोधात पाकिस्तानात स्पेशल ऑपरेशन राबवू शकते. राठोड यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, म्यानमार मध्ये भारतीय सेना घुसखोरांविरोधात स्पेशल ऑपरेशन राबवू शकते, तर दाऊदविरोधात का नाही ? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “ होऊ शकते दाऊदच्या विरोधातही असे करावे लागेल, पण तसे करण्याआधी चर्चा केली जाणार नाही. असे ऑपरेशन झाल्यानंतर त्यासंदर्भात काही सांगता येईल. सरकार त्याबाजूने काय निर्णय घेते, यावर ते ऑपरेशन अवलंबून आहे. ते गुप्त किंवा स्पेशल ऑपरेशनही असू शकते.” असे ते म्हणाले. नंतर त्यांनी याबाबतचे विधान दुरूस्त करण्याचाही प्रयत्न केला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो असे ते म्हणाले.
पुढील स्लाईड्सवर वाचा..
मोदींविषयी काय म्हणाले अजीज ?
काश्मीर सीमाप्रश्नाबाबत वक्तव्य