आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार आठ युद्धनौका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानने चीनकडून ८ युद्धनौका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकार चीनला सुमारे ५ अब्ज डॉलर्स देणार असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा समितीकडून चीनसोबतच्या कराराला मंजुरी देण्यात आली आहे.
हा करार करण्यात काहीही गैर नसल्याचे सांगून संरक्षणमंत्री मुख्तार खान यांनी चीनसोबतच्या कराराचे समर्थन केले आहे. दोन्ही देशातील हा करार गेल्या महिन्यात निश्चित झाला होता. पाकिस्तानचे नौदल प्रमुख मुहम्मद झकुल्ला यांनी गेल्या महिन्यात चीनला भेट दिली होती. २६ मार्च रोजी झकुल्ला यांनी चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे प्रमुख फॅन चाँगलाँग यांची भेट घेऊन देशाला आवश्यक असणाऱ्या संरक्षण साहित्यावर सविस्तर चर्चा केली होती.

जुने मित्र : चुनयिंग : चीन आणि पाकिस्तान जुने मित्र-शेजारी आहेत. उभय देशातील संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी असे व्यवहार होणे स्वाभाविक आहे. लष्करी आणि शस्त्रास्त्र पातळीवर उभय देशांत व्यापार देखील नैसर्गिक प्रक्रिया आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे.

सर्वात मोठा पुरवठादार : पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या देशांमध्ये चीन हा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. रणगाडे, युद्ध नौका, लढाऊ विमानांचा पुरवठा चीनकडून केला जातो.