इस्लामाबाद - अमेरिका 4500 कोटी रुपयांच्या अनुदानावर पाकिस्तानला आठ एफ - 16 लढाऊ विमान विकणार होता. पण, आता पाकिस्तानची चीनसोबत वाढणारी जवळीकता पाहून अमेरिकेने अनुदान देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानने हा खरेदी व्यवहार रद्द केला. शिवाय जॉर्डनकडून ही विमाने खरेदी करण्याची तयारी केली, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी यांनी दिली.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव काय म्हणाले...
> पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज चौधरी मंगळवारी म्हणाले, पाकिस्तानच्या या निर्णयावर अमेरिका समाधानी दिसत आहे.
> पाकिस्तान आता अमेरिकेकडून एफ-16 फाइटर जेट विकत घेणार नाही. त्या ऐवजी जॉर्डनकडून ही विमाने घेतली जातील.
> पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीमुळेच दोन्ही देशांत जणाव वाढत आहे, अशी कबुलीसुद्धा चौधरी यांनी दिली.
अमेरिका पाकिस्तानमध्ये झाला होता करार
> फेब्रुवारी महिन्यामध्ये अमेरिकेने पाकिस्तानला आठ एफ - 16 लढाऊ विमान विकण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती.
> 700 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या या व्यवहारात अमेरिका पाकिस्ताना अनुदानसुद्धा देणार होता.
> अमेरिकेच्या या निर्णयावर भारताने भारतातील अमेरिकेतील राजदूताला बोलावून त्यांच्याकडे नाराजीसुद्धा व्यक्त केली होती.