आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुत्सद्देगिरीला ओहोटी; पाकिस्तान अमेरिकेत लॉबिस्टच्या शोधात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेत आपल्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी पाकिस्तानला लॉबिस्टची आवश्यकता भासत आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूताचे प्रवक्ते नदीम होतियाना यांनी लॉबिस्टच्या शक्यतेचा दुजोरा दिला.

पाकिस्तानला अमेरिकेत गेल्या काही दिवसांत अनेक धक्कादायक निर्णयांना सामोरे जावे लागले. अमेरिकेकडून मिळणाऱ्या एफ - १६ लढाऊ विमानांचा व्यवहार रद्द झाला. त्याला मिळणारी आर्थिक मदत रखडली. यानंतर अणुपुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळाला नाही. परिणामी पाकिस्तानने आता अमेरिकेत चांगला लॉबिस्ट शोधणे सुरू केले आहे. याबाबत नदीम म्हणाले, अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानात तालिबानविरुद्धच्या लढ्याबाबत मतभेद आहेत. पाकिस्तान अतिरेकी गट नष्ट करण्यात अपयशी ठरत असल्याचे अमेरिका वारंवार सांगत आला आहे. अबोटाबादमध्ये अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन लपून बसल्याची माहिती पाकिस्तानने दडवल्याने अमेरिकेचा पाकवरील विश्वास उडाला आहे. त्यांनी ओसामाला ठार मारले. अमेरिकेने या वर्षी पाकिस्तानमध्ये तालिबानचा अतिरेकी मुल्ला अख्तर मन्सूरला ठार मारले. पाकिस्तानची यामुळे अमेरिकेवर नाराजी आहे.

बेनझीर यांचा निकटवर्तीय होता या कामासाठी
पाकिस्तानने २००८ मध्ये लॉक लॉर्ड स्ट्रॅटेजीजची सेवा लॉबी करण्यासाठी घेतली होती. मात्र, २०१३ मध्ये त्याची सेवा पुढे सुरू राहू शकली नाही. संबंधित संस्थेचे भागीदार मार्क सिगल दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे निकटवर्तीय होते. यामुळे या ग्रुपची सेवा घेतल्याचे मानले जाते. दूतावास या ग्रुपला दरमहा ७५,००० डॉलर (साधारण ५१ लाख रुपये) देत होते.
बातम्या आणखी आहेत...