आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Varsity Trained Students To Support LeT Via Social Media

\'लश्कर-जमात\'च्या मदतीने PAK मध्ये विद्यार्थ्यांना दहशतवादाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानात पदवीधर विद्यार्थ्यांना दहशतवादाचे धडे दिले जात असल्याचा दावा, अमेरिकेच्या एका गुप्तचर संस्थेने केला आहे. या कामात 'लश्कर-ए-तोयबा' व 'जमात-उद-दावा' सारख्या दहशतवादी संघटनांचे सहकार्य घेतले जात आहे.

यूएस नॅशनल सिक्युरिटीच्या सुत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयद्वारा 'फेसबुक' व 'ट्विटर'च्या माध्यमातून 'लश्कर-ए-तोयबा' व 'जमात-उद-दावा' सारख्या दहशतवादी संघटनांना सहकार्य करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्‍यात आले आहे. दरम्यान, मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद हा दोन्ही संघटणांना म्होरक्या आहे.

पुरावे मिळाले...
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ हे व्हाइट हाऊसमधील बड्या अधिकार्‍यांची भेट घेत असतानाच यूएस नॅशनल सिक्युरिटी डिपार्टमेंटने खुलासा केला होता. इतकेच नव्हे तर पाकिस्तानी सोशल मीडियावर दहशतवादी संघटनांना भारतविरोधी षडयंत्रात सहकार्य करण्यासाठी कॅम्पेन सुरु आहे. विद्यार्थ्यांना दहशतवादी बनवण्यासाठी अभियान राबवले जात आहे.

पीटीआयनुसार, पाकिस्तानातील मलिक सलमान जावेद नामक एका व्यक्तिने नुकतेच 'स्ट्रेटेजेम' हे ऑनलाइन मॅगझिन सुरु केले होते. पाकिस्तानातील नॅशनल डिफेन्स यूनिव्हर्सिटीमधून (एनडीयू) मलिकने शिक्षण घेतले आहे. तो ट्विटरच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून 'जमात उद-दावा'ला पाठिंबा देत आहे.

'स्ट्रेटेजेम'च्या पहिल्या अंकात एम. जेनुलबीदिन अमीर नामक एका लेखकाने जमात-उद- दावाच्या मौलाना हमजा यांना इस्लाम समर्थक म्हणून सांगितले होते. अमीर आपल्या फेसबुक पेजवर देखील जमात-उद- दावाच्या समर्थनार्थ लिहितात.