आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात एका पोलिस अधिकाऱ्यास वॉरंट, सरबजित हत्याप्रकरणी कोर्टाने फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - सरबजितच्या हत्या प्रकरणी पाकिस्तानच्या न्यायालयाने एका तुरुंगाधिकाऱ्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. हे वाॅरंट जामीनपात्र आहे. खटल्यास हजर न राहिल्याबद्दल न्यायालयाने हे वाॅरंट बजावले आहे.

२०१३ मध्ये सरबजितची तुरुंगात हत्या झाली होती. दोन कैद्यांनी सरबजितची हत्या केली होती. या प्रकरणाची सुनावणी सुरू असून  वारंवार समन्स पाठवूनही हा अधिकारी न्यायालयासमोर हजर राहिला नाही. कोट लखपत तुुरुंगाचे उपतुरुंगाधिकाऱ्यास बुधवारी न्यायालयाने हे आदेश दिले. सरबजितच्या प्रकरणाच्या तपासात फारशी काही प्रगती झालेली नाही, अशा शब्दांत कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना फटकारले. तुरुंग प्रशासन तपासात सहकार्य करत नसल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती मझर अली अकबर नक्वी यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय न्यायालयीन आयोगाने सरबजितच्या हत्येच्या प्रकरणात तपास केला होता. नक्वी यांनी आपल्या तपासात ४० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांनी आपला अहवाल सरकारकडे सादर केला आहे. परंतु अद्यापही त्याबाबतची माहिती जनतेसमोर आलेली नाही. आयोगाने सरबजितच्या नातेवाईकांना देखील हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. परंतु अद्यापपर्यंत सरबजितच्या नातेवाइकांनी आपले जबाब नोंदवलेले नाहीत. दरम्यान, सरबजितला १९९० च्या बाँब स्फोटाच्या घटनेत दोषी ठरवून त्यास मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती.
 
अहवालात गुन्ह्याची कबुली
आरोपी तांबा व मुदस्सर  यांनी सरबजितवर तुरुंगात प्राणघातक हल्ला केला होता. त्यामुळेच सरबजितचा मृत्यू झाला, अशी कबुली या दोघांनी दिली आहे, असे एकसदस्यीय आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...