आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधील पाणीटंचाई, भारत जबाबदार नाही, स्थानिक मीडियातील दावे पाकिस्ताननेच फेटाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - सिंधू जलवाटप कराराकडे दुर्लक्ष करून भारताने पाकिस्तानचे पाणी लाटले आहे. त्यामुळेच पाणीटंचाई सुरू आहे, हा दावा पूर्णपणे खोटा आहे, असे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच म्हटले आहे. एरवी कोणत्याही गोष्टींचा कांगावा करणाऱ्या शेजाऱ्यांनी पाण्यावरून मात्र सद्सद््विवेकाचे दर्शन घडवले.

इंडस रिव्हर सिस्टिम अथॉरिटीचे अध्यक्ष राव इर्शाद अली म्हणाले, भारताने पाकिस्तानचे पाणी पळवल्याचा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमातून केला जात आहे, परंतु या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. वास्तविक दोन्ही देशांत झालेल्या जलवाटपाच्या मर्यादेपेक्षाही पाण्याचा कमी वापर भारताकडून होतो.
सिनेटर इक्बाल झाफर झागरा यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबादमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अली यांनी हे स्पष्ट केले. ही बैठक गुरुवारी झाली. कराराकडे भारताने कानाडोळा केल्याचा दावाही मीडियातून झाला होता. परंतु त्याला काहीही आधार नाही. दरम्यान, २००८ मधील मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने भारतावर ‘जल दहशतवाद’ करत असल्याचा सातत्याने आरोप केला आहे. त्यातूनच पाकिस्तानमध्ये अशांतता असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परंतु अली यांची भूमिका मात्र सईदच्या दाव्याला खोडून काढणारी आहे.
१९६० चा जलवाटप करार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जलवाटपाचा करार १९ सप्टेंबर १९६० मध्ये झाला होता. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्राध्यक्ष अय्युब खान यांनी जलवाटप कराराच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.