आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानात उभारणार गुरूनानकांचे परमसेवक मरदाना यांचे स्मारक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - शिखांचे पहिले गुरू श्री गुरू नानक देव यांचे अनन्य सेवक भाई मरदाना यांचे स्मारक नानकानासाहिब येथे पाकिस्तान सरकार उभारणार अाहे. यासंदर्भात भारताकडून अारेखन मागवण्यात अाले असून एक्यू ट्रस्ट प्राॅपर्टी बाेर्डचे अध्यक्ष फारूक उल सिद्दीक यांनी ही माहिती दिली.

नानकानासाहिबमधील गुरुद्वारा गुरूमलजीसाहिबच्या जवळ भाई मरदाना यांचे स्मारक उभारण्यास परवानगी देण्यात अाली अाहे. भारताकडून या स्मारकाचे डिझाइन मागवण्यात अाले असल्याची माहिती फारूक यांनी दिली असली तरी स्मारकासाठी अपेक्षित खर्च किती असेल त्यांनी सांगितले नाही. दरम्यान, १५ जून राेजी फिराेजपूरमध्ये पंजाब सरकारच्या वतीने १० एकर जमिनीवर ७.५० काेटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या स्मारकाची काेनशिला उभारण्यात अाली. ट्रस्टच्या वतीने स्मारकाची उभारणी करण्यात येणार असून शीख संगत मदत करू शकते. अनेक वर्षांपासून श्री गुरू नानक देव अांतरराष्ट्रीय विद्यापीठ उभारण्याचे काम प्रस्तावित अाहे अाणि त्याचा काेनशिला समारंभ बाबाजींच्या अागामी प्रकाश पर्वाच्या वेळी पार पडेल. यासाठी जगभरातील प्रमुख शिख जत्थेदारांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले अाहे.

गुरू नानकांचे परमसेवक
भाई मरदाना हे गुरू नानकांचे परम सेवक हाेते अाणि अायुष्यभर त्यांनी बाबाजींची सेवा करीत जगभ्रमण केले. त्यांचा जन्म १४५९ मध्ये नानकाना साहिबमधील मदरा मरदाना यांच्या घरी झाला. त्यांचे निधन १५३४ मध्ये करतारपूरसाहिबला झाले, अाजही त्यांचे वंशज पाकिस्तानात वास्तव्यास अाहेत.
बातम्या आणखी आहेत...