आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान कुलभूषण जाधव यांची कागदपत्रे संयुक्त राष्ट्राकडे सादर करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तान दहशतवादी कारवाया आणि हेरगिरीच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याशी संबंधित नवीन कागदपत्रे संयुक्त राष्ट्राकडे सुपूर्द करणार असल्याचे प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.  
 
जाधव यांनी कराची आणि बलुचिस्तानमधील कथित कारवायांबाबत लष्करी न्यायालयात नोंदवलेल्या जबाबाचे दस्तऐवज तयार केले आहेत. ही कागदपत्रे विविध देशांच्या राजदूतांना दिली जातील. विविध देशांतील पाकिस्तानच्या राजदूतामार्फत त्या-त्या देशांना पुरवली जातील.

भारताच्या मागणीला पाकचा प्रतिसाद नाही  
जाधव प्रकरणात आरोपपत्र आणि निकालाची प्रमाणित प्रत देण्याबाबत भारताच्या मागणीला पाकने अद्याप प्रतिसाद दिला नाही. जाधव यांच्या फाशीेविरुद्ध अपील करणार असल्याचे भारताने याआधीच स्पष्ट केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...