आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या लोकशाहीवरून सैन्याधिकाऱ्यांनी शिकावे, पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांनी सहकाऱ्यांना दिला सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - सरकार चालवणे हे सैन्याचे काम नव्हे. लष्कराला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. ही गोष्ट भारताच्या लोकशाहीकडून नक्कीच शिकली पाहिजे, असे इतर कुणी नव्हे तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख कामर जावेद बाजवा यांनी आपल्याच सैन्याधिकाऱ्यांना सुनावले आहे. पाकिस्तानातील एखाद्या उच्चपदस्थाने देशातील अराजकाची जाहीर कबुली देण्याची ही पहिलीच वेळ असावी.  

सरकार चालवणे हा काही लष्कराच्या कामाचा भाग नव्हे. म्हणूनच राज्यघटनेने आखून दिलेल्या चौकटीतच लष्कराने आपली भूमिका वठवली पाहिजे. सैन्याधिकाऱ्यांनी स्टिव्हन विल्किन्सन यांनी लिहिलेले ‘आर्मी अँड नेशन’ नावाचे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. हे पुस्तक स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कराच्या देशातील नागरिकांशी असलेल्या संबंधावर प्रकाश टाकणारे आहे. ते वाचा, असे सल्ला बाजवा यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.
 
बाजवा यांचे वक्तव्य ‘द नेशन’मधून प्रकाशित झाले आहे. डिसेंबरमध्ये रावळपिंडी येथे लष्करी अधिकाऱ्यांसाठी आयोजित स्नेहमेळ्याप्रसंगी त्यांनी ही भूमिका मांडली होती, असा दावा वृत्तपत्राने केला आहे.
 
त्यात त्यांनी लष्कराच्या भूमिकेत परिवर्तनाची आवश्यकता प्रतिपादित केली होती. वास्तविक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी राहिल शरीफ यांनी हटवून बाजवा यांची नेमणूक केली होती. त्यांच्याशी पंतप्रधानांचे संबंध चांगले राहिले नव्हते. वास्तविक पाकिस्तानात लष्कर-सरकार यांच्यातील संबंध हा नेहमीच वादाचा विषय राहिलेला आहे.  दरम्यान, १९४७ नंतर पाकिस्तानात हुकूमशहांनी सत्ता गाजवली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून भारतात घुसखोरी होते. त्याला लष्कराचा छुपा पाठिंबा असतो. त्यातून दहशतवाद वाढीला लागला. सीमेवरील तणावात आणि हल्ल्यांतही वाढ होत गेली, हे जगाला ठाऊक आहे. 
 
पुस्तकात काय आहे?  
विल्किन्सन यांच्या ‘आर्मी अँड नेशन’ या तीनशे पानांच्या पुस्तकात भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. फाळणीनंतर लष्कर व सरकार यांच्यातील असंतुलनाला दुरुस्त करण्याचे काम भारताने केले, असा दावा विल्किन्सन यांनी पुस्तकातून केला आहे.  
बातम्या आणखी आहेत...