आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्मी आणि शरीफ अझहर-सईदविरोधात कारवाई का करत नाही, Pak मीडियाचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या एखाद्या वृत्तपत्राने लष्कर आणि सरकारच्या निर्णय आणि धोरणांवर प्रश्न उपस्थित करण्याची ही आठवड्यातील दुसरी वेळ आहे. - Divya Marathi
पाकिस्तानच्या एखाद्या वृत्तपत्राने लष्कर आणि सरकारच्या निर्णय आणि धोरणांवर प्रश्न उपस्थित करण्याची ही आठवड्यातील दुसरी वेळ आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानातील ‘द नेशन’ वृत्तपत्राने सरकार आणि आर्मीला जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या विरोधात कारवाई का करत नसल्याचा सवाल केला आहे. हे दोघेही राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचेही म्हटले आहे. वृत्तपत्राच्या संपादकीय भागात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

अत्यंत महत्त्वाचा लेख..
- पाकिस्तानी सरकारचे निर्णय आणि धोरणांवर माध्मातून प्रश्न उपस्थित केला जाण्याची या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. - काही दिवसांपूर्वी ‘द डॉन’ वृत्तपत्राने बातमी दिली होती की, जगात एकटं पडण्याच्या भितीने नवाज शरीफ यांनी आर्मीला दहशतवादी संघटनांच्या विरोधात कडक कारवाई करण्यास सांगितले होते. हे सर्व भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर घडले होते.
- ‘द डॉन’च्या आर्टिकलनंतर नवाज सरकारने पत्रकार सेरिल अलमिडा यांच्या देशाबाहेर जाण्यार बंदी लादली होती. पण बुधवारी या वृत्तपत्राने लष्कर आणि सरकारमधील मतभेदाची बातमी खरी असून या बातमीवर ठाम असल्याचे म्हटले होते.

मीडियाला लेक्चर..
- ‘द नेशन’ने बुधवारी प्रश्न उपस्थित केला की, सरकार आणि आर्मी मसूद अझहर आणि हाफिज सईदवर तर अॅक्शन घेत नाही, उलट मीडियाला लेक्चर दिले जाते.
- मसूद अझहर पठानकोट तर हाफिज सईद 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.
- दहशतवादी संघटनांचे हे दोन्ही प्रमुख पाकिस्तानात खुलेआम फिरतात. दोघांनाही पाकिस्तानी आर्मीकडून संरक्षण मिळाले असल्याचा दावा वृत्तपत्रात करण्यात आला आहे.
- सरकार आणि सेना मीडियालाच त्यांचे काम शिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्तपत्रात म्हटले आहे.

फक्त घोषणाबाजी..
- ‘द डॉन’चे वृत्त सरकारने तीन वेळा फेटाळले आहे. नवाज शरीफ आणि आर्मीत काहीही मतभेद नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न वारंवार केला जात आहे.
- मंगळवारी चौथ्यावेळी लष्कर आणि सरकारचे अधिकारी समोर आले. देशहितासाठी कशा प्रकारे रिपोर्टींग करायला हवी, हे मीडिया हाऊसेसनी लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले.

मोठा प्रश्न..
- ‘द नेशन’ने त्यांच्या अग्रलेखात म्हटले आहे की, सेरिल अलमीडाचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले जात आहे. पण सरकार दहशतवागी संघटनांविरोधात कारवाई का करत नाही हेच कळत नाही.
- सईदवर कारवाई केल्याने राष्ट्रीय सुरक्षेला कसा धोका निर्माण होईल हे स्पष्ट करायला हवे.
धोका का वाढेल..
- आर्टिकलमध्ये नवाज आणि आर्मीवर टीका करताना म्हटले आहे की, ज्या हिमतीने आम्हाला काम शिकवले जाते, ज्या हिमतीने एका पत्रकाराला गुन्हेगारासारखे वागवले जाते, त्याच हिमतीने आम्हाला नॅशनल इंटरेस्ट शिकवला जात आहे.
- अलमीडालाही वृत्तपत्राने पाठिंबा दर्शवला. ‘द नेशन’ ने लिहिले आहे, ‘अलमीडा आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमची कलम अधिक शक्तीशाली करण्यासाठी मीडिया तुमच्याबरोबर आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पाकिस्तानी मीडियाने केलेली टीका...
बातम्या आणखी आहेत...