आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बलुचिस्तान-सिंधुदेशवरुन पाकिस्तानी पेटले, लंडन-जर्मनी-सिंध प्रांतात जोरदार निदर्शने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद (पाकिस्तान)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला जनतेला संबोधित करताना बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. त्यानंतर स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या नेत्यांनी भारताचा ध्वज आणि मोदींचा फोटो घेऊन आंदोलन सुरु केले होते. आता याला एक वेगळे वळण मिळाले आहे. केवळ बलुचिस्तानच नव्हे तर गिलगित, पीओके आणि वेगळ्या सिंधुदेशाची मागणीही जोर पकडू लागली आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान सरकार पेचात अडकले आहे. प्रकरण एवढे गंभीर वळणावर आले आहे, की आर्थिक हितसंबंधांना बाधा पोहोचली तर बलुचिस्तान प्रकरणी मध्यस्थी करण्याची धमकी चीनने दिली आहे.
लंडनमध्ये पाकिस्तान सरकार विरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आले. लंडनमधील बलोच आणि सिंधी नेत्यांनी चीनी दुतावासासमोर पाकिस्तान आणि चीनी इकॉनॉमिक कॉरिडोरविरुद्ध नारे दिले. यावेळी ‘है हक हमारा आजादी’ आणि ‘सीपीईसी नही चाहिए’ अशा स्वरुपाचे नावे देण्यात आले.
पाकिस्तानमधील सिंध प्रांतात नागरिकांनी वेगळ्या सिंधुदेशाची मागणी केली आहे. सिंध प्रांतातील मीरपूर खास परिसरात नागरिकांनी मोठा मोर्चा काढला होता. त्यांनी वेगळ्या सिंधुदेशाची मागणी केली आहे. सिंध प्रांताची संस्कृती इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळी आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी राजकारणावर सिंध प्रांतात दबदबा राहिला असून हा प्रांत आर्थिकदृष्या प्रबळ आहे. त्यामुळे हा वेगळा देश करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा... मोदींबद्दल काय म्हणाले बलोच निदर्शक... चीनने काय घेतली भूमिका.... अखेरच्या स्लाईडवर बघा या घटनेचा व्हिडिओ....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...