आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 वर्षांची पाकिस्तानी तरुणी जेनिथ, बाईकवर एकटीने केली POK ची ट्रीप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- बाईकवरुन पाकव्याप्त काश्मिरची ट्रीप करणारी 20 वर्षांची जेनिथ इरफान पहिली पाकिस्तानी तरुणी ठरली आहे. पाकिस्तानातील समाजात मुलींना कमी लेखले जाते. त्यांच्यावर काही बंधनेही लादण्यात आली आहेत. तरीही ही बंधने झुगारुन जेनिथने पाकव्याप्त काश्मिरचा एकटीने दौरा केला. विशेष म्हणजे पाकिस्तानी लोकांनी तिच्या या दौऱ्याचे कौतुक केले आहे.
वडीलांची इच्छा पूर्ण करीत आहे
जेनिथ इरफान सांगते, की जग बाईकवर फिरण्याचे माझे वडीलांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ही ट्रीप काढली. यासाठी होंडा-125, सीडी-70 आणि सुजुकी जीएस-150 बाईकवर प्रवास केला. जेव्हा तिला विचारण्यात आले, की मुलगी असताना एकटीने बाईकवर दौरा कसा काय केला.. त्यावर ती म्हणाली, की तरुणी बाईक का चालू शकत नाहीत...
फेसबुकवर सांगितली अॅडव्हेंचरची गोष्ट
व्हाईट हेल्मेट घालून आणि बाईकच्या मागे बॅगपॅक करुन उत्तर पाकिस्तानातील अवघड रस्ते, उंच पर्वत आणि दऱ्या-खोऱ्या जेनिथने पार केल्या. लाहोरमधून 14 जूनपासून ही ट्रीप सुरु झाली होती. 20 जूनला ती परत आली. त्यानंतर तिने 'जेनिथ इरफान: वन गर्ल टू व्हील्स' फेसबुक पेजवर प्रवासाचे अनुभव शेअर केले आहेत.
आई म्हणाली, बाईकवर जा...
जेनिथ म्हणाली, की माझ्या ट्रिपला कुणी विरोध केला नाही. माझी आई खुप लिबरल आहे. तिनेच मला बाईक रायडिंगची प्रेरणा दिली. पाकिस्तानी समाजात असे करणे धर्माविरोधी समजले जाते. तरुणीने असे केल्यास अपमान आणि मानहानी समजली जाते. पण जेनिथने एक नवीन पायंडा पाडला आहे. त्याचे लोकांकडून कौतुक होत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, जेनिथचे फोटो....