आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी दैनिक डॉनवर सायबर हल्ले, 3 महिन्यांपासून लक्ष्य केले जात असल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायबर हल्ल्यांना कंटाळून पाकिस्तानी दैनिकाने आपल्या संकेतस्थळावर अशी नोटीस लावली. - Divya Marathi
सायबर हल्ल्यांना कंटाळून पाकिस्तानी दैनिकाने आपल्या संकेतस्थळावर अशी नोटीस लावली.
इस्लामाबाद - पाकिस्तानचे प्रसिद्ध दैनिक 'डॉन' च्या ऑनलाईन आवृत्तीवर सायबर हल्ले होत आहेत. दैनिकाने आपल्या संकेतस्थळाच्या होमपेजवर एक नोटीस लावली आहे. त्यामध्ये आपल्या माध्यम संस्थेवर गेल्या 3 महिन्यांपासून हॅकिंगचे प्रयत्न केले जात आहेत असा दावा करण्यात आला आहे. 
 
फेसबूक पेजसह, पत्रकारांनाही लक्ष्य
डॉनने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे केवळ संकेतस्थळच नव्हे, तर चक्क दैनिकाचे फेसबूक आणि ट्वीटर पेज सुद्धा हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच, माध्यमाशी संबंधित पत्रकार आणि संपादकांचे खासगी सोशल मीडिया अकाउंटवर सुद्धा सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. 
 
संस्थेची कुप्रसिद्धी करण्याचा प्रयत्न
कुठल्याही परिस्थितीत संकेतस्थळ ताब्यात घेऊन चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती देऊन संस्थेची कुप्रसिद्धी कशी करता येईल हा सायबर हल्लेखोरांचा मुख्य हेतू आहे. पाकिस्तानातील भडकाऊ भाषण विरोधी कायदा आणि ईशनिंदा संदर्भातील सर्व नियमांना अनुसरूनच या संकेतस्थळावर बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. दैनिकावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या विकासावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न आहे असेही या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...