आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Media Slams Nawaz Sharif By Comparing With Modi

मोदींचे स्टारप्रमाणे स्वागत, मग नवाज काय करताहेत? पाक मीडियाचा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत जबरदस्त क्रेझ असल्याचे पाक मीडियाने मान्य केले आहे. अमेरिकेत मोदींचे एखाद्या स्टारप्रमाणे स्वागत होत आहेत. दुसरीकडे पाकिस्तानचे पीएम नवाज शरीफ यांच्या मागेतर कोणीही नसल्याचे दिसते आहे, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांमध्ये येत आहे. पाकिस्तानातील ‘द नेशन’ ने त्यांच्या संपादकीयमध्ये लिहिले की, नवाज शरीफ त्याठिकाणी काय करत आहेत? पाकिस्तानने मोदींकडून वेळेते महत्त्व समजायचे शिकायला हवे.

यामुळे पाक मीडियाने केली असावी टीका..
मोदींनी भेट घेतलेले सीईओ
अॅपलचे टीम कूक, फेसबूकचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई यांची मोदींनी भेट घेतली. तसेच 4.5 ट्रिलियन डॉलर नेट वर्थ असलेल्या फॉर्च्यून-500 मध्ये सहभागी असलेले 50 सीईओ, मीडिया इंडस्ट्रीजचे 12 आणि फाइनांशिअल कंपन्यांच्या 8 सीईओंना मोदी भेटले. फेसबूकमध्ये टाऊनहॉल आणि गूगलच्या ऑफिसमध्ये त्यांचा काळ चर्चेत राहिला. ते बांगलादेशचे पंतप्रधान आणि जॉर्डनच्या किंगबरोबरही चर्चा केली.
इंडियन कम्युनिटी रिसेप्शन
मोदींचे सॅन हॉसेमधील सॅप सेंटरमध्ये सोमवारी सकाळीच रिसेप्शन झाले आहे. त्यात 18 हजार भारतीय अमेरिकन नागरिक उपस्थित होते.
नवाज यांना किती नेते भेटले
दुसरीकडे नवाज शरीफ यांची आतापर्यंत केवळ मायक्रोसॉफ्टचे फाऊंडर बिल गेट्स आणि टेलिनॉरचे सीईओ फ्रेडरिक बॅकसास यांच्याशीच भेट झाली आहे. त्याशिवाय युनायटेड नेशन्सचे जनरल सेक्रेटरी बान की मून, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आणि श्रीलंकेचे अध्यक्ष एम श्रीसेना यांनाच ते भेटले आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पाकिस्तानी मीडियाने कशी केली मोदींची स्तुती आणि शरिफांवर टीका...