आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव यांची दया याचिका पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने फेटाळली; पुराव्यांची छाननी करुन निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाधव यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
जाधव यांचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित आहे. (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची दया याचिका तेथील लष्करी अपील कोर्टाने फेटाळली आहे. आता पाकचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा त्यांच्या अपिलावरील पुराव्यांची छाननी करत असून अंतिम निर्णय तेच घेणार आहेत.

पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांच्यानुसार, बाजवा हे जाधव यांची याचिका दखलपात्र आहे का नाही, या आधारावर निर्णय घेतील. लष्करी कोर्टात याचिका फेटाळल्यानंतर जाधव यांनी गेल्या महिन्यात बाजवा यांच्याकडे अपील दाखल केले आहे. तेथेही ते फेटाळले गेल्यास जाधव यांच्याकडे पाकच्या राष्ट्रपतींकडे दया याचिका मांडण्याची संधी आहे. जाधव यांची आई अवंतिका यांच्या अपिलावरही पाकिस्तानी अधिकारी विचार करत आहेत. आंतरराष्ट्रीय कोर्टाने भारताच्या अपिलावर जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिलेली आहे. या प्रकरणावर सप्टेंबरमध्ये पुढील सुनावणी होईल.