अयान अली या मॉडेलला एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात चीफ गेस्ट म्हणून बोलावण्यात आल्याने पाकिस्तानात नवा वाद सुरू झाला आहे. मनी लाँडरींगचा आरोप असल्याने या अभिनेत्रीला बोलावण्याच्या निर्णयावर प्रश्नंचिन्हं उपस्थित केले जात आहे. सोशल मिडियावर या मुद्यावरून चांगलीच टिका सुरू झाली आहे.
अयान ही पाकिस्तानच्या फॅशन इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध मॉडेल आहे. अयानचा जन्म दुबईत झाला आहे. पाकिस्तान next top model of Pakistan या स्पर्धेची विजेती म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. वयाच्या 16 व्या वर्षी तिने करिअरला सुरुवात केली होती. तेव्हापासूनच तिने काही मॉडेलिंग शो, जाहिराती, रॅम्प सो करायला सुरुवात केली होती. तिने सोनिया बटला, कर्मा, गुल अहमद टेक्सटाईल, इत्तिहाद टेक्सटाईल, एचएचवाय आणि चिन्येरे या ब्रँड्सबरोबर काम केले आहे. तसेच यूफोन, सनसिल्क, मॅकडोनाल्ड आणि सॅमसंगसारख्या प्रसिद्ध ब्रँडसाठी तिने जाहिरातीही केल्या आहेत. डायमंडसाठीही तिने साहिरात केली आहे. केल्विन क्लिन कंपनीची ती ब्रँड अॅम्बेसेडरही होती. काही आंतरराष्ठ्रीय प्रोजक्टरवरही तिने काम केले आहे.
काही दिवसांपूर्वी विमानतळावर एका ब्रीफकेसमध्ये पैसे घेऊन जाताना तिला अटक करण्यात आली होती. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर तिला सोडून देण्यात आले होते. पाकिस्तानातून एकावेळी 10 हजारपेक्षा अधिक डॉलर घेऊन जाण्यास परवानगी नाही. नुकतीच जुलै महिन्यात तिची जामीनावर सुटका झाली होती.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अयान अलीचे PHOTOS