आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानचे विमान कोसळले, महिला वैमानिकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
लाहोर - पाकिस्तान वायुसेनेचे एक प्रशिक्षणातील लढाऊ विमान पंजाब प्रांतात काेसळल्याने महिला वैमानिकाचा मृत्यू झाला. फ्लाइंग आॅफिसर मरियम मुख्तार या विमान चालवत होत्या. विमान अपघातात मृत्यू पावणाऱ्या त्या पाकिस्तानच्या पहिल्याच महिला वैमानिक आहेत.
पायलट स्क्वाड्रन लीडर साकिब अब्बासी या अपघातात गंभीर जखमी झाले. चीनची
निर्मिती असलेले एफटी-७ पीजी विमानाने मियांवाली विमानतळावरून उड्डाण भरले होते. दरम्यान, कुंदियाजवळ यात तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकांनी बिघाड दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न येऊ शकल्याने दोघांनीही विमानातून उडी घेतली.
दरम्यान, यात गंभीर जखमी झालेल्या मरियम यांचा मृत्यू झाला. पाकिस्तान वायुसेनेत कार्यरत सुमारे ३०० महिलांमध्ये फक्त २४ वैमानिक आहेत. मरियम यांचा एक शिस्तबद्ध महिला वैमानिक म्हणून नावलाैकिक हाेता. त्यांच्या मृत्यूमुळे वायुसेनेचे माेठे नुकसान झाले अाहे.