आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्न-अफेयरमुळे गाजत राहिला पाकचा हा नेता, बेनझीरसोबतही होते अफेयर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इमरान खानचे पाकिस्तानची माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टोसोबतही अफेयर राहिले. - Divya Marathi
इमरान खानचे पाकिस्तानची माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टोसोबतही अफेयर राहिले.
इंटरनॅशनल डेस्क- क्रिकेटरपासून पॉलिटिशियन बनलेला इमरान खानने आता ब्रिटन दौ-यात आपल्या तिस-या लग्नाचे संकेत दिले आहेत. इमरानने सांगितले की, त्याचे लग्नाचे रिकॉर्ड चांगले राहिले नाही. हे असे होऊ शकते की, तिसरे लग्न लकी ठरू शकेल. प्ले ब्वॉयची इमेज असणा-या इमरानचे पहिले लग्न जैमिमा खानसोबत झाले होते, मात्र हे नाते संपुष्टात आले. यानंतर वर्षभरापूर्वी केलेले दुसरे लग्नही दहा महिन्यातच तुटले.
अनेक महिलांशी राहिले अफेयर-
इमरानच्या गर्लफ्रेंड्सच्या लिस्टमध्ये पाकिस्तानची माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, क्रिस्टीन बॅकर, सुसान्नाह कॉन्सटेनटाइन, एमा सर्जेंट आणि सीता व्हाईट यासारख्या महिलांचा समावेश आहे. सीता व्हाईटला तर इमरानपासून बिन लग्नाचीच मुलगी सुद्धा आहे.
ऑक्सफोर्डमध्ये सुरु झाले होते बेनजीरसोबत अफेयर
- प्ले ब्वॉय इमेजचा क्रिकेटर आणि पॉलिटिशियन इमरान खानचे पाकिस्तानची माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टोसोबतही अफेयर राहिले.
- याचा उल्लेख इमरान खानच्या बायोग्राफीत केला गेला आहे.
- बायोग्राफीत दिलेल्या माहितीनुसार, 1975 च्या दरम्यान दोघेही ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीत शिक्षण घेत होते. त्यावेळी बेनजीर भुट्टोचे वय 21 वर्षे होते.
- त्या काळात बेनजीर आणि इमरान खान दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही कारणांनी त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
- ही बाब वेगळी आहे की, 2009 मध्ये या घटनेचा खुलासा झाल्यानंतर पाकिस्तानचे राजकारण तापले होते. तर अनेकांनी इमरान खोटे बोलत असल्याचे म्हटले होते.
पर्सनल लाइफ, येथून झाली सुरुवात-
इमरान खान नियाजीचा जन्म 25 नोव्हेंबर 1952 रोजी लाहौरमध्ये झाला.
- त्याचे पिता इकरमुल्लाह खान नियाजी व्यवसायाने एक सिविल इंजीनियर होते.
- इमरान लहानपणी खूपच लाजरा होता. त्याचे शालेय शिक्षण इंग्लंडमधील रॉयल ग्रामर स्कूल वोरसेस्टरमध्ये झाले.
- तेथेच त्याला क्रिकेटचे बाळकडू मिळाले व पुढे क्रिकेटमध्ये नाव कमावले.
- 1972 मध्ये इमारानने ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून पॉलिटिक्स आणि इकॉनमिक्समध्ये पदवी मिळवली.
- पाकिस्तानच्या राजकारणात आता इमरान एक मोठे नाव आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...