आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Sikh Minister Sardar Soran Singh Shot Dead

शीख नेत्याची केली पाक तालिबानने हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर- पाकिस्तानच्या पश्चिमोत्तर प्रांतातील शीख नेत्याच्या हत्येची जबाबदारी पाकिस्तान तालिबानने स्वीकारली आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने शनिवारी हे जाहीर केले. संघटनेच्या बंदुकधाऱ्यांनी पाकिस्तानातील नेते सरदार सुरन सिंग यांची हत्या केली होती.

पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्र्यांचे सिंग हे विशेष सहायक होते. बुनेर जिल्ह्यातील पीरबाबा भागात शुक्रवारी त्यांच्यावर दुचाकीस्वारांनी हल्ला केला होता. त्या वेळी ते फेरफटका मारून घरी परतत होते. सिंग यांच्यावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक राजकीय नेते उपस्थित होते.

तेहरिक-ए-इन्साफचा नेता इमरान खानने त्यांच्या हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे.

डॉक्टर-टीव्ही अँकरही
सुरनसिंग पाकिस्तानातील राजकारणात जेवढे परिचित होते. तेवढेच ते टीव्ही समालोचक म्हणूनदेखील देशात परिचित होते. २०११ मध्ये ते तेहरिक-ए-इन्साफ पार्टीत सहभागी झाले होते. ते जमात-ए-इस्लामी पाकिस्तानचे नऊ वर्षे सदस्य होते. पाकिस्तानची शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सदस्य होते.