आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमधील सोशल मीडिया स्टार कंदील बलोचच्या हत्येप्रकरणी भावासह तिघांवर आरोपपत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानमधील सोशल मीडिया स्टार कंदील बलोचच्या हत्येप्रकरणी तिचा भाऊ, चुलतभाऊ यांच्यासह तिघांवर पंजाब प्रांतातील न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. ‘ऑनर किलिंग’च्या या घटनेने पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

मुलतान शहरातील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सईद अहमद रझा यांनी कंदीलचा भाऊ वसीम, तिचा चुलतभाऊ हक नवाझ आणि टॅक्सीचालक अब्दुल बासित या तिघांवर आरोप ठेवले. मात्र तिघांनीही गुन्हा केल्याचा इन्कार केला. चौथा आरोपी जफर हुसैन खोसा याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. वसीमने दंडाधिकाऱ्यांसमोर गुन्हा कबूल केला होता, असा दावा पोलिसांनी केला, पण त्याच्या आरोपींनी अशी कबुली दिल्याचे वृत्त फेटाळले. न्यायालयाने या खटल्याची सुनावणी आता ८ डिसेंबरला ठेवली असून साक्षीदारांना त्या दिवशी हजर राहण्यास सांगितले आहे.

असे आहे प्रकरण
कंदील बलोच तिच्या बोल्ड व्हिडिओ आणि चित्रांमुळे प्रकाशझोतात आली होती. तिची ही छायाचित्रे सोशल मीडियावर झळकत होती. २५ वर्षीय कंदील बलोच मुलतान येथील तिच्या घरात १६ जुलैला मृतावस्थेत आढळली होती. धाकटा भाऊ वसीमनेच ऑनर किलिंगच्या नावाखाली तिची हत्या केली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. वसीमनेही हत्येची कबुली दिली होती. कबुलीजबाब देणाऱ्या व्हिडिओत वसीमने म्हटले होते की, मी जे केले त्याचा मला अभिमान आहे. मी तिची हत्या केली.
बातम्या आणखी आहेत...