आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Taliban Claim Successful Test Fire Of Missile

तालिबानने तयार केले उमर-1 क्षेपणास्त्र, पाकिस्तानच्या अण्वास्त्रांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे. तालिबानने या क्षेपणास्त्राला उमर-1 हे नाव दिले आहे. मात्र या क्षेपणास्त्राच्या रेंजची माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तानमधील पख्तूनख्वा हा भाग तालिबान्यांचा गड मानला जातो. येथून भारतीय सीमा 600 किलोमीटरवर आहे.
पाकिस्तानी फौजांशी लढत असलेल्या टीटीपीने एक पत्रक जारी करुन उमर-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचा दावा केला आहे. त्यासोबतच एक व्हिडिओ जारी केला आहे. यात क्षेपणास्त्र तयार केले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. टीटीपीचा प्रवक्त मुहम्मद खुरासनी क्षेपणास्त्राबद्दल म्हणतो, 'गरजेनुसार क्षेपणास्त्राची केव्हाही जोडणी करता येऊ शकते. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट याचे डिझाइन आहे.'
'लवकरच शत्रूंना पळवून लावू'
टीटीपीचा प्रवक्ता खुरासनी म्हणाला, 'उमर-1 क्षेपणास्त्र शत्रूंच्या मनात धडकी भरवेल. अल्लाहची मर्जी असेल तर हे क्षेपणास्त्र आमच्या शत्रूंना लवकरच सळो की पळो करुन सोडेल. आमच्या इंजिनिअरिंग विभागाकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र तयार करण्याची क्षमता आहे. आम्ही आमच्या जवानानां तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करण्याची संधी देत आहोत. आमच्याकडे सुसाइड वेस्ट, सुसाइड गाड्या, हँड ग्रेनेड, अँटी जॅमर डिव्हाइस देखील आहे.'
आण्विक अस्त्रांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
टीटीपीच्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीच्या वृत्तानंतर पाकिस्तानच्या आण्विक अस्त्रांच्या सुरक्षीततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.