आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवाद कुणाचा हे स्पष्ट झाले, पर्रीकरांच्या विधानावर पाककडून तीव्र प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या वक्तव्यावरून पाकमध्ये दहशतवाद कोण पसरवत आहे, हे स्पष्टच होत असल्याचे पाकचे गृहमंत्री चौधरी निसार अली यांनी गुरूवारी म्हटले आहे. पर्रीकरांचा नामोल्लेख न करता त्यांनी भारतावर जहाल टीका केली.

पाकमध्ये दहशतवाद कोण पसरवत आहे, हे परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानावरून स्पष्टच होत असल्याचे ते म्हणाले. त्यांचे विधानच पुरावा मानावे, असे निसार म्हणाले. भारताचा उल्लेख न करता त्यांनी ही टीका केली. इस्लाम शांतताप्रिय धर्म आहे. काही लोक त्याचा गैरवापर करून दहशत माजवीत आहेत. फ्रंटीयर पोलिस दलाच्या संचलन समारंभात ते बोलत होते. ज्यांना पाकिस्तानची भरभराट पाहवत नाही, तेच घटक येथील दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. संरक्षण मंत्र्यांच्या विधानावरून आता जगासमोर वास्तविकता आली आहे. पाक देशांतर्गत, देशाबाहेर दहशतवादाचा मुकाबला करत असल्याचे जगासमोर स्पष्ट आहे. आमच्या भूप्रदेशाला बळकावण्याचे व मशिदींच्या विटंबनेची कृत्ये आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका निसार यांनी मांडली. दरम्यान, परदेशात पोसलेल्या दहशतवादाची किंमत भारताला चुकवावी लागत आहे. २६/११ सारख्या घटनांना रोखण्यासाठी भारत सजग असून याची पुनरावृत्ती होणार नाही, असे विधान पर्रिकरांनी केले होते. दहशतवादाचा मुकाबला दहशतवादानेच केला जाईल. मी माझ्या सैनिकांचा बळी का द्यावा? असा सवाल पर्रीकरांनी उपस्थित केला होता.
यावर पाक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. भारतातही या विधानाचा निषेध केला गेला.
बातम्या आणखी आहेत...