आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan\'s Cricketer Imran Khans Wife Reham Say About Their Relation

अख्खे पाकिस्तानच बनले होते सासर, जाणून घ्या काय म्हणते इम्रान खानची घटस्फोटित पत्नी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेहम खान. - Divya Marathi
रेहम खान.
लंडन- माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानच्या पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांचा पत्नी रेहम खानशी झालेल्या काडीमोडाच्या कारणावरून अनेक अटकळी आहेत. दरम्यान, दुसरे कुणीही नाही तर आम्ही दोघेच या घटस्फोटासाठी जबाबदार असल्याचे रेहम यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात प्रत्येक जण आमच्या वैवाहिक आयुष्यात तोंड खुपसू लागला होता. अख्खे पाकिस्तानच हे आपले सासर असल्याचे आपल्याला वाटू लागले होते, असे रेहम म्हणाल्या.
याच वर्षी जानेवारीत इम्रान यांचा टीव्ही पत्रकार रेहमशी निकाह झाला होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये तलाकचे वृत्त आले. इम्रान यांनी राजकारणात रेहम यांच्या हस्तक्षेपाला विरोध केल्याची चर्चा होती. लंडनमधील गार्डियन या वृत्तपत्रात रेहम यांनी लेख लिहून भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या लिहितात, पाकमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तीशी विवाह केल्यानंतरही शिव्याशापांच्या माऱ्यातून आपला बचाव होऊ शकला नाही. मी आणि एखाद्या गरीब आणि निरक्षर महिलेला एकच धोका होता. तो म्हणजे कोणताही पुरुष आमच्यावर चिखलफेक करू शकतो, आम्हाला शिव्या देऊ शकतो, आमच्या चारित्र्यावर संशय घेऊ शकातो. दुर्दैव म्हणजे हे सर्व सिद्ध न करताही तो नामानिराळा राहू शकतो.
घटस्फोटासाठी आम्हीच जबाबदार
रेहम म्हणाल्या, इम्रानसोबत विवाहविच्छेदासाठी अनेक लोकांना जबाबदार धरले जात आहे. मात्र, आम्ही पती-पत्नीच त्यासाठी जबाबदार आहोत.
घटस्फोटाच्या कारणांवरून सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम देत त्या म्हणाल्या की, हे नाते इतके मजबूत असते की ते कोणताही हल्ला, अफवा वा दबावाचा सामना करू शकते. मात्र, आमचे संबंध तुटण्यामागे दुसरे कुणीही नाही तर आम्हीच जबाबदार आहोत. आम्ही दोघे परिपक्व आहोत. हे सर्व घडले कारण आम्ही ते घडू दिले.
राष्ट्रीय भाभी बनले
रेहम म्हणाल्या, आपल्या समाजात महिला या सासू आणि नणंदेच्या लुडबुडीचे गाऱ्हाणे करत असतात. मात्र, ‘राष्ट्रीय भाभी’ होण्याचा अर्थ अवघा देशच माझे सासर होते. म्हणजेच प्रत्येकाला आमच्या खासगी बाबीत तोंड खुपसण्याचा हक्क होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इम्रान आणि रेहमचे खास PHOTOS...