आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistans Former President Asif Ali Zardari Plans To Launch Daughter Into Politics News In Marathi

बख्तावर IN बिलावल OUT, झरदारींची कुटनिती, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: भाऊ बिलावलसोबत बख्तावर)

कराची- पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांची मुलगी बख्तावर या लवकरच सक्रीय राजकारणात उतरणार आहेत. बख्तावर यांचे वडील आणि पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) को-चेअरमन आसिफ अली झरदारी याविषयी येत्या चार एप्रिल रोजी अधिकृत घोषणा करणार आहेत.

मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पक्षात दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फायदा पीएमएल (एन) सारखे विरोधी पक्ष घेऊ शकतात, अशी भीती कार्यकर्त्यांना सतावते आहे.

दुसरीकडे, बेनझिर भुट्टो यांचा पुत्र बिलावल राजकारणात येणार असल्याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती; परंतु बिलावलने सध्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले असून ते सध्या ब्रिटनमध्ये आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि बख्तावर हिचे आजोबा ज्युल्फिकार अली भुट्टो यांची चार एप्रिल रोजी 36वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त सिंध प्रांतातील खुदा बख्श येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी आसिफ अली झरदारी आणि बख्तावर उपस्थित राहाणार आहेत. यावेळी बख्तावर देशाच्या सक्रीय राजकारणात उतरणार असल्याची झरदारी अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती पीपीपीचे नेते वकार मेहदी यांनी दिली. मात्र, या कार्यक्रमात बिलावल सहभागी होणार नाही.
पाकिस्तानच्या राजकारणात उतरण्याची बिलावल यांची इच्छा नाही. त्यामुळे बख्तावर यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
बख्तावर यांना दिली जातेय ट्रेनिंग
पीपीपीच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बख्तावर भुट्टो झरदारी यांना पक्षाच्या ज्येष्ठ महिला नेता राजकारणाचे धडे देत आहेत. बख्तावर सध्या पाकिस्तानातील राजकीय स्थिति, विरोधी पक्ष तसेच देशाची परिस्थितीची माहिती करून घेत आहेत. पीपीपी तसेच पाकिस्तानच्या राजकारणाचा इतिहास जाणून घेत आहे. भाषण देणे, कार्यकर्त्यांना संबोधित करणे तसेच मीडियाशी कशाप्रकारे संवाद साधावा, यासंदर्भात ट्रेनिंग घेत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून याचा, बख्तावर यांच्या पर्सनल लाईफविषयी...