आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pak गुप्तचर संघटना ISI प्रमुखाला नाही हेरगिरीचा अनुभव, आता हटवण्याची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी गुप्तचर संघटना (आयएसआय) प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना त्या पदावरून हटविण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. - Divya Marathi
पाकिस्तानी गुप्तचर संघटना (आयएसआय) प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना त्या पदावरून हटविण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानी गुप्तचर संघटना (आयएसआय) प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना त्या पदावरून हटविण्याच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर रिझवान यांचा लगाम नसल्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांना इशारा दिला आहे. दहशतवाद्यांना लगाम नसल्यानेच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायात वेगळा पडू शकतो अशी भीती शरीफ यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांचे पद जाणार अशी चर्चा आहे.
असे असले तरी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयच्या प्रमुखाला हेरगिरीचा कोणताही अनुभव नाही. भारताने पाकव्यप्त कश्मीरमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केल्याने रिझवान आणि आयएसआय या गुप्तचर संस्थेबाबत पाक सरकारने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याचमुळे हेरगिरीचा कसलाही अनुभव नसलेल्या रिझवान यांची आगामी काळात सुट्टी होईल असे बोलले जात आहे. नवाझ शरीफ यांना वेगळीच भीती...
- अमेरिकन वॉर कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतलेले लेफ्ट. जनरल रिझवान अख्तर यांना हेरगिरीचा प्रत्यक्ष अनुभव नाही.
- 'अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वासाची कमतरता आणि दहशतवादाविरोधातील युद्ध' यांसारख्या विषयावर शोधनिबंध लिहिला होता.
- तरीही अमेरिकेने त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
- आता त्याच अख्तर यांना पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे भाऊ शाहबाज तसेच स्वत: नवाझ शरीफ यांनी कडक इशारा दिला आहे की, जर तुम्ही दहशतवाद्यांवर लगाम घातला नाही तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायात वेगळा पडेल.
कराचीतील गँगवॉरचा केला खात्मा-
- एप्रिलमध्ये एका गोळीबारात जिओ न्यूज या पाकिस्तानी चॅनलच्या स्टार रिपोर्टरचा मृत्यू झाला होता.
- त्यासाठी आयएसआयला जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान शरीफ रिझवान यांच्यावर रागावलेले आहेत.
- रिझवान हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ यांच्या जवळचे मानले जातात.
- सिंध आणि कराचीत काम केलेल्या लष्करी अधिकाऱ्याचीच आयएसआयच्या प्रमुखपदी नियुक्ती होते.
- रिझवान यांनी पाकिस्तानी सरकारच्या इशाऱ्यावरून कराचीतील गँगस्टरचाही खात्मा केला आहे.
रिझवान यांची पायदळावर पकड-
- लेफ्ट. जनरल रिझवान अख्तर 1982 पासून ते लष्करात आहेत.
- जगातील सर्वात धोकादायक गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाला हेरगिरीचा अनुभव नाही.
- मात्र, त्यांची पायदळावर पकड आहे. सिंधच्या कराचीत असताना दहशतवाद्यांशिवाय गुंडांचाही सफाया त्यांनी केला आहे.
- त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चांगले अतिरेकी आणि वाइट अतिरेकी ही संकल्पना त्यांना मान्य नाही.
- पण दुसरीकडे त्यांची कार्यशैली अशी आहे की, उत्तर वजिरीस्तानमध्ये जेव्हा दहशतवाद्यांविरोधात लष्करी कारवाई सुरू करायची होती तेव्हा याच आयएसआय प्रमुखाने तालिबानचा सहकारी गट हक्कानी नेटवर्कच्या लोकांना सुरक्षित बाहेर जाऊ दिले होते. त्यामुळेच अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांना शह मिळू शकला.

कोण आहेत लेफ्ट. जनरल रिझवान अख्तर -
- पाकिस्तानी गुप्तचर संघटना (आयएसआय) प्रमुख पदावर मागील दोन वर्षापासून कार्यरत पण गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाला हेरगिरीचा अनुभव नाही
वय : सुमारे 54 वर्षे
शिक्षण : कमांड ऑफ स्टाफ कॉलेज क्वेटा, नॅशनल डिफेन्स युनि. इस्लामाबाद, यूएस आर्मी वॉर कॉलेज, पेनसिल्वानिया येथून युद्ध अभ्यासात पदव्युत्तर पदवी.
चर्चेत का? : आयएसआय प्रमुखपदावरून हटवण्याची तयारी सुरू झाली आहे.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, पाकिस्तान गुप्तच संघटेनेचे प्रमुख लेफ्ट. जनरल रिझवान अख्तर यांच्याविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...