आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नजरकैदेतून सुटला हाफिज; म्हणाला, काश्मिर स्वतंत्र होणार, भारत मला हातही लावू शकणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाफिज सईद - Divya Marathi
हाफिज सईद

लाहोर- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अतिरेकी संघटना जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईद पुन्हा पाकिस्तानात मुक्तसंचारास मोकळा झाला आहे. लाहोर हायकोर्टाच्या न्यायमूर्तींच्या बोर्डाने बुधवारी सईदच्या सुटकेचे आदेश दिले. त्याची नजरकैद तीन महिन्यांनी वाढवून देण्याची पंजाब सरकारची याचिका फेटाळत बोर्ड म्हणाले, त्याला इतर एखाद्या खटल्यात कैदेत ठेवायचे नसेल तर सध्याची कैद संपताच सरकारने त्याची मुक्तता करावी. अतिरेकी कारवायांतील सहभागामुळे पाक सरकारने ३१ जानेवारी २०१७ मध्ये सईद व त्याच्या ४ सहकाऱ्यांना नजरकैदेत ठेवले होते. सरकार अद्याप त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे देऊ शकलेले नाही.. 


काय म्हणतो पाकचा कायदा?
- पाकिस्तानच्या कायद्यानुसार सरकार कोणत्याही आरोपीला 90 दिवस ताब्यात ठेवू शकते. त्याच्या अटकेचा कालावधी वाढवण्याचा निर्णय फक्त ज्यूडिशियल रिव्ह्यू बोर्डच करू शकतो. 14 ऑक्टोबरला पंजाब सरकारने सर्वांना धक्का देत हाफिज सईद आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या नजरकैदेचा कालावधी वाढवण्याची मागणी मागे घेतली होती. सरकारने बोर्डाला म्हटले होते की, त्यांना आता अँटी टेररिझम अॅक्ट अंतर्गत सईदला नजरकैदेत ठेवायचे नाही.  
- पंजाब सरकारने अँटी-टेररिझम अॅक्ट 1997 अंतर्गत 31 जानेवारीपासून 90 दिवसांपर्यंत सईदला आणि त्याच्या चार सहकाऱ्यांना नजरकैदेत ठेवले होते. यापूर्वी दोन वेळा हा कालावधी पब्लिक सेफ्टी लॉ अंतर्गत वाढवण्यात आला होता. 


कोण आहे हाफीज सईद.. 
- हाफिज सईद दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा म्होरक्या आहे. तो लश्कर-ए-तोयबाचाही सहसंस्थापक आहे. या दोन्ही संघटनांचा भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात आहे. हाफिजवर अमेरिकेने 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. इंटरपोलनेही त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिसही जारी केली आहे. 
- पाक सरकारने हाफिजचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्ट (ECL) मध्येही समाविष्ट केले आहे. म्हणजे त्याला पाकिस्तान सोडून बाहेर जाता येणार नाही. पाकिस्तानने हाफिज सईद दहशतवादी असल्याचेही मान्य केले आहे. पंजाब प्रांतातील सरकारने सईदचे नाव अँटी-टेररिझम अॅक्ट (ATA) च्या 4th शेड्यूलमध्ये समाविष्ट केले आहे.  
- हाफिज सईद मुंबईच्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यांमध्ये 6 अमेरिकन नागरिकांसह 166 लोकांनी प्राण गमावले होते. 

बातम्या आणखी आहेत...